अंधाऱ्या वर्गखोलीत वैैष्णवीचा चार तास टाहो

By Admin | Updated: November 19, 2014 00:58 IST2014-11-19T00:57:40+5:302014-11-19T00:58:42+5:30

उमरगा : शाळेच्या शिपायाने वर्गातील मुलीला न पाहताच वर्ग खोली कुलूपबंद केल्याने चार तास वर्गात कोंडून राहिलेल्या विद्यार्थिनीची अखेर ग्रामस्थांच्या मदतीने चार तासानंतर सुटका करण्यात आली

For four hours Vaishnavani is in the dark square | अंधाऱ्या वर्गखोलीत वैैष्णवीचा चार तास टाहो

अंधाऱ्या वर्गखोलीत वैैष्णवीचा चार तास टाहो


उमरगा : शाळेच्या शिपायाने वर्गातील मुलीला न पाहताच वर्ग खोली कुलूपबंद केल्याने चार तास वर्गात कोंडून राहिलेल्या विद्यार्थिनीची अखेर ग्रामस्थांच्या मदतीने चार तासानंतर सुटका करण्यात आली. ही घटना तालुक्यातील तुरोरी येथील जि.प. शाळेत सोमवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, या घटनेचे पडसाद ग्रामस्थात उमटल्याने मंगळवारी सकाळी तुरोरी जि.प. शाळेत तणाव निर्माण झाला होता.
याबाबत गटशिक्षणाधिकारी व्ही.जी. राठोड यांनी दिलेली माहिती अशी की, तुरोरी येथील जि.प. शाळेत चौथीच्या वर्गात वैष्णवी ज्ञानेश्वर सूर्यवंशी ही १० वर्षांची विद्यार्थिनी शिकत आहे. वैष्णवीचे वडील ज्ञानेश्वर व आई अर्चना सूर्यवंशी हे शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेत नेहमीप्रमाणे वैष्णवी शाळेत दाखल झाली. सायंकाळी साडेचार वाजता शाळा सुटल्यानंतरही वैष्णवी घरी आली नाही. ६ वाजेपर्यंत तिच्या आईने गल्लीत इकडे तिकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. नेहमी वेळेवर घरी परतणारी आपली मुलगी इतका उशीर होवूनही परतत नसल्याने आई-वडिलांनी संपूर्ण गावात शोधाशोध केली. ही बातमी वाऱ्यासारखी गावत पसरली.
रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास काही ग्रामस्थांनी शाळेच्या परिसरात वैष्णवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेणाऱ्या ग्रामस्थांना खिडकीतून पाहून तिने हंबरडा फोडला. ग्रामपंचायत सदस्य उमाजी तपसाळे व अन्य ग्रामस्थांनी चार तास अंधारात कोंडून राहिलेल्या वैष्णवीच्या वर्गखोलीचा दरवाजा तोडून तिला बाहेर काढले. दरम्यान, रात्री आठ वाजता ग्रामस्थांनी शाळेभोवताली तोबा गर्दी केली होती. सदर घटना पोलिसांना समजल्याने विशेष शाखेचे पोकॉ लखन गायकवाड, पोकॉ हुसेन सय्यद, पोहेकॉ गोकुळ गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमलेल्या ग्रामस्थांची समजूत घालून वैष्णवी व तिच्या आई-वडीलांना पोलिसांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: For four hours Vaishnavani is in the dark square