यासंदर्भात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नियोजित लोककला अकादमीचे प्रमुख व लोकसाहित्य आणि लोककलांचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, मुबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख आणि प्रसिद्ध लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव प्रा. डॉ. आशिष गाडेकर, भारूडरत्न निरंजन भाकरे, ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे, डॉ. शेषराव पठाडे, अजिंक्य लिंगायत, दिलीप खंडेराय, लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तस्लिम पटेल, राजलक्ष्मी भोसले आदींची उपस्थित होती.कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात लोककला अकादमीची रचना व स्वरूपाबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात कुलपती अंकुशराव कदम म्हणाले की, प्रत्येक राज्याची स्वतंत्र लोककला आहे. महाराष्ट्रालाही लोककलांचा समृद्ध वारसा असून, अनेक प्रतिभावान लोककलावंत आज उपेक्षित असल्यामुळे लोककला जिथल्या तिथे आहेत.
या विभागातत लोककलांमधील विविध विषयांचे शिक्षण घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सिनेमा, नाटक, रेडिओ, दूरदर्शनसह शासनाच्या विविध विभागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगूलन एमजीएम विद्यापीठातर्फे येथे पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘मराठवाडा लोकात्सव’ आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा प्रा. डॉ. खांडगे यांनी केली.
चौकट.....
सादरीकरणाने रंगत !
यावेळी डॉ. शेषराव पठाडे यांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांंचा पारंपरिक गण, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी खंडू कवी यांची गवळण आणि शाहीर अजिंक्य लिंगायत यांनी शाहीर आत्माराम पाटील यांचा फटका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कुलसचिव प्रा. डॉ. आशिष गाडेकर, प्रा. डॉ. रेखा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.