शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरण्यासाठी उडतेय झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:00 IST

पाणीटंचाई : खोडसगाव, खोंडामळी, कोळदे, शिंदे गावांची स्थिती

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, शिंदे, खोडसगाव, खोंडामळीसह परिसरात भरपावसाळ्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत आह़े पाणी नसल्याने येथील हातपंपावर पावसाळ्यातही रांगा कायम असल्याची विदारक स्थिती निर्माण झालेली आह़े या गावांमधील हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड होत आह़े काहींना पाणी मिळत नसल्याने अनेक वेळा शाब्दीक चकमक होत असत़े पावसाने पाठ फिरवली असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े शेतकरी जुन महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या आठवडय़ात कापूस टोचणी, ज्वारी पेरणी, मिरची लावणी करीत असतात़ जुलै-ऑगस्ट महिन्यात पिक बहरत असल्याने त्यांना पाण्याची मोठी गरज असत़े परंतु आता पाणीटंचाईमुळे पिकांना पाणी मिळत नसल्याने साहजिकच पिक धोक्यात आलेली आहेत़ पाऊसच नसल्याने येथील विहिरी तसेच गाव तलावांनी तळ गाठला आह़े त्यामुळे साहजिकच 8 ते 15 दिवस पाणीपुरवठा होत नाही़ ग्रामस्थांनी साठवणूक केलेले पाणीसुध्दा संपूण जात असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत असत़े ब:याच प्रतीक्षेनंतर आलेले पाणीसुध्दा कमी दाबाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े परिसरात बोटावर मोजण्याइतकेच हातपंप असल्याने त्यावरच संपूर्ण गावांची भिस्त आह़े पाणी पातळीत घट झाल्याने त्यातूनही अत्यंत कमी पाणी  येत आह़े याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथे पाणीपुरवठयाची समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थाना विशेषता महिला वर्गाला पाण्यासाठी तासन्तास हातपंपावर रांगा लावाव्या लागत आहे. पावसाळ्यातसुध्दा पाणीटंचाई निर्माण झाल्याने सर्वच चिंतेत आहेत़