जालन्याने उडवला सीएमएचा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:24 IST2018-05-30T00:24:15+5:302018-05-30T00:24:52+5:30

वेगवान गोलंदाज रामेश्वर दौड आणि फिरकी गोलंदाज व्यंकटेश काणे यांची सुरेख कामगिरी आणि स्वप्नील पठाडेचे आक्रमक अर्धशतक या जोरावर जालना संघाने एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शिरपूर येथील लढतीत पुण्याच्या सीएमए संघावर ८ गडी राखून मात केली. या सामन्यात रामेश्वर दौडने ७0 धावांत एकूण ८ गडी बाद केले. त्याला साथ देणाऱ्या व्यंकटेश काणे याने ८२ धावांत एकूण ६ गडी बाद करीत साथ दिली.

Flammable CMA burns | जालन्याने उडवला सीएमएचा धुव्वा

जालन्याने उडवला सीएमएचा धुव्वा

ठळक मुद्देरामेश्वर, व्यंकटेश चमकले : स्वप्नीलचे अर्धशतक

औरंगाबाद : वेगवान गोलंदाज रामेश्वर दौड आणि फिरकी गोलंदाज व्यंकटेश काणे यांची सुरेख कामगिरी आणि स्वप्नील पठाडेचे आक्रमक अर्धशतक या जोरावर जालना संघाने एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शिरपूर येथील लढतीत पुण्याच्या सीएमए संघावर ८ गडी राखून मात केली. या सामन्यात रामेश्वर दौडने ७0 धावांत एकूण ८ गडी बाद केले. त्याला साथ देणाऱ्या व्यंकटेश काणे याने ८२ धावांत एकूण ६ गडी बाद करीत साथ दिली.
जालना संघाने पहिल्या डावात १६५ धावा केल्या. त्यानंतर सीएमएचा पहिला डाव ५४ धावांत गुंडाळताना त्यांच्यावर फॉलोआॅन लादला. सीएमएचा संघ दुसºया डावात १९७ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून आदित्य मगरने ९0 व जयराज दिवाण याने ५0 धावांची झुंजार खेळी केली. जालना संघाकडून रामेश्वर दौडने ४१ धावांत ५ गडी बाद केले. त्याला व्यंकटेश काणे याने ७८ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. शोएब सय्यदने १ गडी बाद केला. त्यानंतर जालना संघाने विजयी लक्ष्य २ गडी गमावून ८७ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून स्वप्नील पठाडे याने ५0 चेंडूंतच ८ चौकारांसह ५२ धावा केल्या. हिंदूराव देशमुखने ४७ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३२ धावांची खेळी केली. सीएमएकडून जयराज दिवाणने २ धावांत २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
जालना (पहिला डाव) सर्वबाद १६५. दुसरा डाव : २ बाद ८७. (स्वप्नील पठाडे ५२, हिंदूराव देशमुख नाबाद ३२. जयराज दिवाण २/२). विजयी विरुद्ध
सीएमए : पहिला डाव : सर्वबाद ५४. दुसरा डाव : सर्वबाद १९७. (आदित्य मगर ९0, जयराज दिवाण ५0. रामेश्वर दौड ५/४१, व्यंकटेश काणे ३/७८).

Web Title: Flammable CMA burns