शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत ‘समृद्धी’वरुन वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST

विजय सरवदे औरंगाबाद : एक मे अर्थात महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ...

विजय सरवदे

औरंगाबाद : एक मे अर्थात महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नियोजन असून नागपूर ते शिर्डी मार्गे औरंगाबाद हा ५२० किलोमिटर अंतराचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. त्या दुष्टीने कंत्राटदार कंपन्यांची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत, असा दावा अधीक्षक अभियंता ए. बी. साळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण करता येईल, या दृष्टीकोणातून ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग ७०१ किलोमिटर लांबीचा असून तो १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांमधून जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये महामार्गाच्या कामाला ‘ब्रेक’ लागला होता. मात्र, आता सर्व कंत्राटदार संस्थांची कामे गतीने सुरू आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात ‘मेगा इंजिनिअरींग’ व ‘एल अँड टी’ या दोन कंत्राटदार संस्था काम करत आहेत. सावंगीजवळील डोंगरात (पूर्वेला) सध्या उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे. साधारणपणे १२२ मिटर लांबीचा बोगदा तया झाला आहे. दुसऱ्या बाजूने अजून कामाला सुरूवात झालेली नाही. या आठवडाभरात बोगदा खोदणारे ‘मेगा’चे दुसरे यंत्र दाखल झाल्यास लगेच पश्चिमबाजूने काम सुरू केले जाईल. सावंगीजवळ औरंगाबाद- सिल्लोड रस्यावर मोठा उड्डाणपुल (अंडरपास जंक्शन) उभारला जात आहे. येथूनच औरंगाबादच्या वाहनधारकाला समृद्धी महामार्गावर जाता येईल व महामार्गावरुन खाली उतरता येईल. पुढे माळीवाड्याजवळही उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. १ मेपूर्वी उड्डाणपुलांची एक बाजू पूर्ण करुन त्यावरुन वाहतूक सुरू केली जाणार आहे.

चौकट....

एक लेन तरी खुली करण्याचा प्रयत्न

अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले की, या महामार्गावरील वाहुतीकीचा पहिला टप्पा १ मे रोजी सुरू करुन शिर्डीपर्यंत दुभाजकाजवळील किमान एक लेनवरुन तरी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आठ पदरी असलेल्या या महार्गाचे काही ठिकाणी पुल किंवा रस्त्याची कामे प्रगतीपथावर असून वाहतूक सुरु झाल्यास अशाठिकाण बाह्यवळण घेऊन वाहनांना जाता येईल. सावंगी येथील जंक्शनजवळ भूसंपादनाचा वाद उद्‌भवला आला आहे. अशा प्रकारचे काही ठिकाणी आलेले अडथळे लवकरच दूर केले जातील.