घाटनांद्र्यात कापसाच्या गोडाऊनला आग, दीड लाखांचे नुकसान

By | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:38+5:302020-12-02T04:10:38+5:30

लालसिंग बिसेन यांनी शेतातील कापूस वेचून गोडाऊनमध्ये ठेवला होता. मात्र, शनिवारी सायंकाळी या कापसाला अचानक आग लागली. गोडाऊनमधून धूर ...

Fire at Ghatanandra cotton godown, loss of Rs 1.5 lakh | घाटनांद्र्यात कापसाच्या गोडाऊनला आग, दीड लाखांचे नुकसान

घाटनांद्र्यात कापसाच्या गोडाऊनला आग, दीड लाखांचे नुकसान

लालसिंग बिसेन यांनी शेतातील कापूस वेचून गोडाऊनमध्ये ठेवला होता. मात्र, शनिवारी सायंकाळी या कापसाला अचानक आग लागली. गोडाऊनमधून धूर निघत असल्याची माहिती शेजारील रामू मोरे यांनी त्यांना फोनवरून दिली. त्यांनी तात्काळ धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या आगीत त्यांचा ५० ते ६० क्विंटल कापूस भस्मसात झाला आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली असून चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: Fire at Ghatanandra cotton godown, loss of Rs 1.5 lakh