छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या मिरवणुकीत पेटवलेल्या फटाक्यांची ठिणगी उडून विमानतळ परिसरातील लाकूड व वाळलेल्या गवतावर पडून आग लागली. रडार परिसरातच ही आग लागल्याने बुधवारी रात्री ९ वाजता विमानतळ परिसरात काही काळ गोंधळ उडाला. बघ्यांच्या गर्दीमुळे जालना रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विमानतळाचा रडार परिसर स्वच्छ करण्यात आला होता. झाडांच्या फांद्या, वाळलेले गवत कापून एकत्र ठेवले होते. बुधवारी विमानतळ परिसरातील एका लॉन्समध्ये विवाह सोहळा होता. त्यापैकी जालना रस्त्यावरून जाणाऱ्या एका वरातीमध्ये फटाके फोडण्यात आले. यातील फटाके हवेत उडून विमानतळाच्या आतील भागात पडून वाळलेली लाकडे व गवताला आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी छत्रपती केकान, जवान योगेश दुधे, आकाश नेहरकर, सुमित चंदनशिव यांनी धाव घेतली. ४५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे केकान यांनी सांगितले.
फटाक्यांमुळे आगीचा अंदाजविमानतळाच्या रडार परिसरात ही आग लागली होती. जालना रस्त्यावरून गेलेल्या लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.-शरद येवले, संचालक, छत्रपती संभाजीनगर विमानतळ
Web Summary : Fireworks from a wedding procession ignited dry grass near Chhatrapati Sambhajinagar Airport's radar, causing a fire. Firefighters quickly controlled the blaze, preventing damage. Traffic was briefly disrupted due to onlookers.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे के रडार के पास एक शादी के जुलूस के पटाखों से सूखी घास में आग लग गई। दमकल कर्मियों ने तुरंत आग पर काबू पा लिया, जिससे नुकसान टल गया। दर्शकों के कारण यातायात बाधित रहा।