शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

आग बुडाला, कुऱ्हाड झाडाला

By admin | Updated: May 27, 2015 00:42 IST

बीड : वृक्षतोडीला लगाम लावावा यासाठी कुऱ्हाड बंदी आणण्यात आली. मात्र वृक्षांची कत्तल करणाऱ्यांनी आता नवीच शक्कल अवलंबविली आहे

बीड : वृक्षतोडीला लगाम लावावा यासाठी कुऱ्हाड बंदी आणण्यात आली. मात्र वृक्षांची कत्तल करणाऱ्यांनी आता नवीच शक्कल अवलंबविली आहे. झाडांच्या बुडाला आग लावून झाड खाली कोसळताच फांद्यासह गायब करण्याचे प्रकार बीड तालुक्यात घडत आहेत. मंगळवारी ‘लोकमत’च्या स्टिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला. तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावर दुतर्फा लिंब, बाभळीची झाडे आहेत. या झाडांमुळे सावली तर मिळतच आहे. शिवाय रस्त्याच्या वैभवात भर पडत आहे. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळींनी झाडांवर थेट कुऱ्हाड चालविण्याआधी झाडाच्या बुडाला आग लावून झाडे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. रस्त्यालगतचे गवत उन्हाळ्यात वाळते. त्यामुळे महामार्गासह इतर रस्त्यांवर आगीचे प्रकार नेहमीच घडत असतात. याचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक आग लावण्याचे धक्कादायक प्रकारही आता घडू लागले आहेत. कारण ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये नागापूर, म्हाळसजवळा शिवारातील झाडांच्या बुडाला आगी लागलेल्या आढळून आल्या. नेमक्या झाडांच्या बुडालाच आग कशी काय लागते? हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या झाडांच्या बुडाला आग लागून झाड कोसळले आहे. या झाडांच्या फांद्या व लाकडे कुऱ्हाडीने तोडून ठेवलेलीही आढळून आली आहेत. त्यामुळे झाडे गायब करण्यासाठीच हा सर्व प्रकार घडवून आणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबत प्रशासनाने कुठलीही ठोस पाऊले उचललेली नाहीत. त्यामुळे झाडांना आग लावून त्याची तस्करी करणाऱ्यांचे बळ वाढत असल्याचे दिसून येत आहे.झाडांची सर्रास कत्तल सुरू असताना ना विभागाचे लक्ष आहे ना बांधकाम विभागाचे. (प्रतिनिधी)रस्त्यालगतच्या झाडांच्या बुंध्यांना आग लागल्यानंतर त्याच्या झळा थेट रस्त्यावर येतात. त्यामुळे रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा आगीच्या झळा बसू नयेत यासाठी वाहनचालकांना वाटेतच अडकून पडावे लागते. शिवाय या आगीमुळे शेतकऱ्यांनी शेतात साचवून ठेवलेल्या पिकांना, कडब्यांना धोका पोहंचण्याची शक्यता आहे. बीड- पिंपळनेर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या झाडांची निगा राखण्याचे काम खरे तर त्यांचे आहे. मात्र झाडांच्या बुडाला आगी लावून कत्तल करण्याचे प्रकार घडत असतील तर मी लगेच पथक पाठवून पाहणी करण्यास सांगतो. नेमके काय घडत आहे हे तपासून कारवाई करण्यात येईल.- आर.आर. काळे, विभागीय वन अधिकारी, बीड