इम्तियाज जलीलसह १७ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:41 IST2017-10-08T00:41:27+5:302017-10-08T00:41:27+5:30

महावितरणचे मुख्य अभियंत्यांच्या दालनात तोडफोड करून अधिकारी-कर्मचा-यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी आ. इम्तियाज जलीलयांच्यासह एमआयएमच्या १७ कार्यकर्त्यांविरुद्ध सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

FIR against 17 people including Imtiaz Jalal | इम्तियाज जलीलसह १७ जणांवर गुन्हा

इम्तियाज जलीलसह १७ जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरणचे मुख्य अभियंत्यांच्या दालनात तोडफोड करून अधिकारी-कर्मचा-यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी आ. इम्तियाज जलीलयांच्यासह एमआयएमच्या १७ कार्यकर्त्यांविरुद्ध सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
आ. इम्तियाज जलील, नगरसेवक नासेर सिद्दीकी, फेरोज पठाण, सय्यद मतीन, रहिम नाईकवाडे, डॉ. गफ्फार कादरी, अरुण बोर्डे, विकास एडके, रफत यार खान, डॉ. अफजल खान अजमल खान, जमीर कादरी, रफिक चित्ता, जफर बिल्डर, फेरोज (रा. लेबर कॉलनी), इर्शाद इब्राहिम खान, शेख सलीम, शेख इलियास अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महावितरणचे कर्मचारी पवनकुमार हुकूमचंद कछोट यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. लोडशेडिंग करीत असताना महावितरण दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत एमआयएमने शुक्रवारी दुपारी मुख्य अभियंता यांच्या दालनात आंदोलन केले. तेव्हा कर्मचा-यांना धक्काबुक्की झाली .

Web Title: FIR against 17 people including Imtiaz Jalal