शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन अर्ज भरण्याचा सर्वत्र फज्जा

By admin | Updated: July 14, 2015 00:27 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी आॅनलाईन यंत्रणा कुचकामी ठरल्याने तसेच अर्ज कसा दाखल करायचा

औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी आॅनलाईन यंत्रणा कुचकामी ठरल्याने तसेच अर्ज कसा दाखल करायचा याची माहिती नसल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच फजिती झाली. गंगापूर : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक महासंग्रामाची सुरुवात झाली आहे़ या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही़ आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे; मात्र आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा गंगापुरातही पूर्णपणे फज्जा उडाला आहे़ आयोगाच्या निर्देशाप्रमाणे यावेळी प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्या त्या ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या ‘संग्राम’मधील संगणकाद्वारे आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत;मात्र आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याचा फज्जा उडाला असून, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व गलथान कारभारामुळे पहिल्याच दिवशी दणका बसला. एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तालुक्यातील ग्रामपंचायतींची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे नेटवर्क वेळेवर मिळत नसल्याने, त्याचप्रमाणे वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे तूर्तास तरी ‘संग्राम’ यंत्रणा कुचकामी ठरत आहे. ग्रामीण भागात या यंत्रणेने पाहिजे तशी प्रगती केली नसताना उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे कुठल्याच प्रकारचे प्रशिक्षण न मिळालेल्या ‘संग्राम’ यंत्रणामध्ये निवडणूक लढविणाऱ्या नवख्या व अशिक्षित उमेदवारांची गळचेपी होताना दिसत आहे. शासनाने आॅनलाईन फॉर्म भरण्याचे आदेश दिले असताना तहसील कार्यालयातून मात्र ५० रुपयांप्रमाणे उमेदवारी अर्जाचे छापील फॉर्म विक्री होताना दिसत आहेत, तर आज दिवसभर गुंतागुंतीच्या आॅनलाईन फॉर्ममुळे तहसील कार्यालयात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. आॅनलाईन उमेदवारी भरण्यात उमेदवारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.