शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उटीतील ५ वर्ग भरतात उघड्यावर

By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST

औसा : शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील कुणी ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही़ याची काळजी शासन घेत आहे़ पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उटी (बु.) शाळेचे

औसा : शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील कुणी ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही़ याची काळजी शासन घेत आहे़ पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उटी (बु.) शाळेचे पाच वर्ग आज उघड्यावर भरत आहेत़ इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे़ वर्षभरापासून इमारत दुरुस्तीची मागणी करुन ही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप सरपंच अ‍ॅड. भालचंद्र पाटील यांनी केला आहे़औसा तालुक्यातील उटी (बु.) हे दोन ते आडीच हजार लोकसंख्येचे गाव गावात जिल्हा परिषदेची १ ली ते ७ वी पर्यंतची शाळा या शाळेत १८७ विद्यार्थी शिक्षण घेतात़ या शाळेमध्ये १ मुख्याध्यापक व ७ शिक्षक आहेत़ शाळेसाठी ७ वर्गखोल्या व १ कार्यालय अशा ८ खोल्या आहेत़ पण ८ मधील पाच वर्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे़ पाच खोल्याच्या छताचा स्लॅब निखळला आहे़ आजही अधुन-मधुन छत निखळून पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक ही वर्गात बसायला तयार नाहीत़ त्यामुळे शाळेचे पाच वर्ग उघड्यावर किंवा व्हरांड्यात भरविण्याची वेळ आली आहे़शासन एकिकडे प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे़ तर दुसरीकडे उटी (बु.) शाळेतील पाच वर्गातील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे़ आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत म्हणून ते भाषण कुठे बसून ऐकावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही भेडसावला़ (वार्ताहर)उटी (बु.) चे सरपंच अ‍ॅड भालचंद्र पाटील या संदर्भात बोलताना म्हणाले कि, मागील वर्षभरापासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व्हावी म्हणून निवेदने दिली़ प्रत्यक्ष भेटी घेतल्या पण अजुनही प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे़ ४या संदर्भात गटशिक्षणाधिकारी उज्ज्वल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ पण संपर्क होऊ शकला नाही़