शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: July 5, 2017 00:20 IST

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ५२० पैकी ७९ बोगस डॉक्टरांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़

भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ५२० पैकी ७९ बोगस डॉक्टरांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़ त्यापैकी ४८ बोगस डॉक्टरांनी आपले व्यवसाय बंद केले असून सात बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत़तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जि़ प़ आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले़ ग्र्रामीण भागात ५२० अधिकृत वैद्यकीय व्यवसायिक असून ७९ अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक आढळून आले़ वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या दवाखान्याची तपासणी आरोग्य पथकाने केल्यानंतर दोषी आढळलेल्या ३२५ रूग्णालयांचा अहवाल जि़ प़ च्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला़ सर्वच तालुक्यांत आरोग्य पथकाने २७ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या दवाखान्याची तपासणी केली़ यामध्ये संबंधित डॉक्टरकडे प्रमाणिक पदवी, बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट होमचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रमाणपत्र, स्थानिक प्राधिकरणाची परवानगी, फायर सेफ्टी, याशिवाय बाह्यरूग्ण नोंदी, आंतररुग्ण नोंदी, दुकाने अधिनियम आदी बाबींची तपासणी करण्यात आली़ तपासणीदरम्यान दवाखान्यात बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट होमचे प्रमाणपत्र , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, स्थानिक प्राधिकरणाची परवानगी, बायोमेडिकल प्रमाणपत्रांचा अभाव असणे तसेच फायर सेफ्टी न बसविणे, शॉप अ‍ॅक्टची परवानगी न घेणे, पदवी नूतनीकरण न करणे आदी त्रुटी आढळून आल्या होत्या़ या अहवालाच्या आधारे जि़ प़ आरोग्य विभागाने नांदेड तालुक्यातील १, धर्माबाद १, हिमायतनगर ३ व उमरी तालुक्यातील २ अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच जिल्ह्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक ३ जुलै रोजी घेण्यात आली़ बैठकीत अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हे, दंडात्मक कारवाई, शिक्षा याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले़ यावेळी भोकर तालुक्यात बोगस डॉक्टरांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास आणले़ तेव्हा संबंधित बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.