वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील निराधारांच्या मंजूर झालेल्या फाईली मागील तीन महिन्यांपासून लालफितीत अडकल्या आहेत. कोणत्या टेबलावर फाईली आहेत हेच कळत नसल्याने लाभार्थी भोकरदन तहसीलच्या चकरा मारत आहे.येथील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजने अंतर्गत गावातील जवळपास ८० ते ९० निराधारांच्या फाईली मंजूर झालेल्या आहे. यात अनेक वयोवृद्धांचा समावेश आहे. फाईली मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी त्यावेळेस भोकरदन येथे मंजुरीपत्रक, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, फोटो व बँकेचे खात्याची पासबुकचीे झेरॉक्स व ईतर कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा केले होते. याला दोन ते तीन महिने झाले तरी अजुनही खात्यावर पैसे जमा न झाले नाहीत.भोकरदन येथे तहसील कार्यालयात गेल्यावर तेथे तुमच्याच फाईलीचे कामे सुरु आहे. याद्या आॅनलाईनची कामे चालु आहे. असे उत्तरे मिळतात. यामुळे नाहकच आलो व मनस्ताप करुन घरी यावे लागल्याचे सुदरांबाई पवार या वयोवृदध महिलेने सांगितले.विशेष या महिलेने सांगितले की, मला श्रावणबाळाच्या फाईलसाठी गेल्या पाच सहा वर्षापासून चकरा मारत आहे. पंरतु या अगोदर माझ्या फाईली नामंजूर होत आल्या. यंदा कंटाळून नाद सोडायचा होता, कारण फाईलला खर्च येत असल्याने तो झेपत नव्हता, परंतु शेवटी शेवटचा प्रयत्न म्हणून आपन फाईल दाखल केली व योगायोगाने फाईल मंजूर झाली. मात्र ती मंजुर होऊनही पैसे भेटत नसल्याने पश्चातापाची वेळ आली असल्याची त्यांनी सांगितले. या याद्यांचे काम किती दिवस चालणार व या लाभार्थांना कधी लाभ होणार, असा सवाल लाभार्थी व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
निराधारांच्या फाईली लालफितीत अडकल्या
By admin | Updated: January 18, 2015 00:27 IST
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील निराधारांच्या मंजूर झालेल्या फाईली मागील तीन महिन्यांपासून लालफितीत अडकल्या आहेत
निराधारांच्या फाईली लालफितीत अडकल्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}