शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास कोटींचा लेंडी प्रकल्प सोळाशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST

नांदेड: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे़ ५६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज सोळाशे कोटींवर पोहोचला आहे़ प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे़ ५६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज सोळाशे कोटींवर पोहोचला आहे़ मावेजा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे़ त्यामुळे मावेजाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत या प्रकल्पाच्या किमतीत आणखीन वाढ होणार हे निश्चित़मुखेड तालुक्यातील गोणेगावच्या लेंडी नदीवर महाराष्ट्र आणि पूर्वीचा आंध्रप्रदेश आणि आताच्या तेलंगणा राज्याकडून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे़ प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले़ या प्रकल्पाअंतर्गत २ हजार ३३१ हेक्टर क्षेत्र हे बुडीत आहे़ ६़३६ टीएमसी साठवणक्षमता असलेल्या या धरणातील महाराष्ट्राच्या ३़९३ टीएमसी तर तेलंगणाच्या वाट्याला २़४३ टीएमसी पाणी येणार आहे़ महाराष्ट्र आणि तेलंगणाचे मिळून एकूण २६ हजार ९२४ हेक्टर क्षेत्राला प्रकल्पाचा लाभ मिळणार असून त्यात महाराष्ट्राचे १५ हजार ७१० तर तेलंगणाचे ११ हजार २१४ हेक्टर एवढे क्षेत्र आहे़ सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ २०१० पर्यंत प्रकल्पावर एक हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता़ अनेक वर्षे निधी न मिळाल्याने काम कासवगतीने सुरु होते़ त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढत जाऊन हजार कोटींच्याही पुढे गेली़ गेल्या काही वर्षांपासून मात्र शेतकऱ्यांनी जमिनीच्या मावेजाची रक्कम नव्या धोरणानुसार देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे़ त्यासाठी शेतकऱ्यांचा शासनासोबत संघर्ष सुरु असून २०११ मध्ये शेतकऱ्यांनी काम बंद पाडले़ ते आजपर्यंत सुरुच झाले नाही़ लेंडी धरणालगत बारा गावांचा बुडीत क्षेत्रात समावेश आहे़ त्यातील ११ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही पूर्णपणे मार्गी लागला नाही़