शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांचे जाळे लावून उपोषण

By admin | Updated: May 28, 2014 00:21 IST

बीड :माजलगाव येथील धरणात मासेमारी करुन उदरनिर्वाह करणार्‍या मच्छीमारांनी न्याय- हक्कासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह जाळे लावून उपोषण केले़

बीड :माजलगाव येथील धरणात मासेमारी करुन उदरनिर्वाह करणार्‍या मच्छीमारांनी न्याय- हक्कासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह जाळे लावून उपोषण केले़ यावेळी संतप्त मच्छीमारांनी रोजीरोटी हिसकावून घ्याल तर महागात पडेल असा सज्जड इशारा तर दिलाच शिवाय न्यायासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी दर्शवली़ माजलगाव धरणाचे क्षेत्र ७ हजार ८९४ इतके आहे़ या धरणावर सावरगाव, शेलापूरी, मंगरुळ, नाथापूर, लिमगाव, सांडस चिंचोली, परडी माटेगाव, लऊळ, ढोरगाव, पुरुषोत्तमपूरी, गुंजमूर्ती, फूलेपिंपपळगाव, ढेपेगाव, नागडगाव, एकदरा, जवळा, बोरगाव आदी गावांतील दहा हजार मच्छीमार मासेमारी करुन आपल्या संसाराचा गाडा हाकतात़ मात्र, एका संस्थेकडे मासेमारीचा ठेका देऊन प्रशासनाने मच्छीमारांना वार्‍यावर सोडले आहे़ विशेष म्हणजे ज्या संस्थेला ठेका मिळाला आहे, त्यांना एक वर्षाचा ठेका विनामूल्य वाढविण्यात आला आहे़ तो रद्द करावा, तलावावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मच्छीमारांची मागणी आहे़ आव्हान संघटनेचे संस्थापक डॉ़ उद्धव नाईकनवरे यांनी मच्छीमारांचा प्रश्न हाती घेतला़ त्यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाचशेवर मच्छीमार कुटुंबियांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले़ यावेळी डोक्यावर पांढर्‍या टोप्या घालून आंदोलनकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरु केली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला़ यावेळी मानवी हक्क अभियानचे अशोक तांगडे, चाईल्ड लाईनचे तत्वशील कांबळे, लोकशासनचे विशाल कदम यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला़ त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन दिले़ जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित संस्थेला दिलेला एक वर्षाचा वाढीव ठेका रद्द करण्यासंदर्भातील अहवाल देणार असल्याचे सांगितले़ महादेव कचरे, भारत घटे, कुसुम लकारे, कमलबाई पल्लारे, राहीबाई घटे, देवचंद्र कचरे, सखाराम कचरे, गंगाधर धुंगासे, सखाराम लकारे, परमेश्वर घटे, चंद्रकला कचरे, नंदा बिजूले, तुकाराम कुटारे, वनमाला धनूरे, सविता घटे, महानंदा घटे, खंडू गिरुते, मालनबाई लुचाटे, राधा लुचारे, विश्वनाथ कुटरे, गणेश परसे यांच्यासह शेकडो मच्छीमार उपस्थित होते़ शेवटपर्यंत लढा मच्छीमारांचे संसार मासेमारीवर अवलंबून आहेत़ ठेकेदाराने त्यांना सळो की पळो करुन सोडले आहे, असा आरोप आव्हान संघटनेचे डॉ़ उद्धव नाईकनवरे यांनी केला़ राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न सुरु आहे़ मात्र, जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरीही मागे हटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले़ शेवटच्या श्वासापर्यंत मच्छीमारांसाठी लढा देऊ असेही ते म्हणाले़ चार आंदोलनकर्ते रूग्णालयात मंगळवारी पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात हलविले. (प्रतिनिधी)