पितृप्रेमाला आले भरते !

By Admin | Updated: June 22, 2015 00:21 IST2015-06-21T23:18:55+5:302015-06-22T00:21:48+5:30

बीड : जिल्ह्यात रविवारी ‘फादर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनाच्या दिवशीच पित्याविरुद्ध कृतज्ञता व्यक्त करण्याचा जुळून आलेला ‘योगायोग’ कोणीही दवडला नाही

Father! | पितृप्रेमाला आले भरते !

पितृप्रेमाला आले भरते !


बीड : जिल्ह्यात रविवारी ‘फादर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनाच्या दिवशीच पित्याविरुद्ध कृतज्ञता व्यक्त करण्याचा जुळून आलेला ‘योगायोग’ कोणीही दवडला नाही. काहींनी फुल देऊन तर काहींनी दर्शन घेऊन वडिलांप्रती प्रेम व्यक्त केले.
प्रत्येक मुलाचा पहिला मित्र हे त्याचे वडील असतात. वेळप्रसंगी रागावणारे, प्रेम करणारे, त्याचवेळी पाठिशी घालणारे ‘बाबा’च असतात. त्यामुळेच वडिलांचे स्थान आदराचे असते. काहींनी आपल्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला तर काही मुलामुलींनी वडिलांच्या प्रेमाची पोस्ट अपलोड केली.
लाडक्या बाबांबद्दल काय वाटते? हे जाणून घेण्यासाठी येथील तरुणांमध्ये डोकावल्यावर पितृप्रेमाचे अनेक पदर उलगडले...
काही तरूण वडिलांना खूप घाबरतात. मनातील गोष्ट ते त्यांच्यासमोर मांडू शकत नाही. वडिलही मुलांवर दबाव आणतात. परंतु हा दबाव आणि भीती दूर सारून वडील आणि मुलांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाल्याचे जाणवले. - प्राचार्य डॉ.वसंत सानप
४मुलींनी फक्त आईजवळच आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करू नयेत, तर त्या वडिलांना पण सांगितल्या पाहिजेत. मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी आई पाया रचते तर वडील त्यावर कळस चढविण्याचे काम करतात. - प्रा.एस.यू.चौभारे
४पालकांबद्दलचा आदर माझ्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत राहील. केवळ ‘फादर्स डे’च्या दिवशी मी त्यांना प्रेम न देता बाराही महिने त्यांच्यावर जीव लावते. मला माझ्या वडिलांचा आदर व अभिमान आहे. - सुहासिनी चक्रे
४वडिलांचे आशिर्वाद हे माझ्यासाठी अनमोल आहेत. ते जरी माझ्यावर रागवत असले तरी त्या रागावण्या मागची भावना त्यांची प्रांजळ असते. माझ्या वडिलांना फुल देऊन मी हा दिवस साजरा केला. - संतोष आजबे

Web Title: Father!