शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:39 IST

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देबीडहून आले ऊस उत्पादक : साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला होते कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.क्रांतीचौकात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे कार्यालय आहे. बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक ऊस उत्पादकांनी या इमारतीत जिन्याच्या पायºयावर बसून आंदोलन सुरू केले. कर्मचारी संपावर असल्याने आज या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. प्रादेशिक सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यादेखील कार्यालयात आल्या नाहीत. साखर कारखानदार आणि सरकारविरोधात ऊस उत्पादकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. बीड जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले की, माजलगाव येथील जयमहेश शुगर इंडस्ट्रिज, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती सहकारी, अशा तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर दिलेला नाही. ही रक्कम सुमारे १५० कोटींपर्यंत आहे. मागील ८ महिन्यांपासून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभावावर सरकारने तूर, मका खरेदी केला; पण त्याची रक्कम खात्यावर जमा झाली नाही, तसेच कर्जही मिळाले नाही. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.या आंदोलनात वसंत सोनवणे, शेख युनूस, गणेश साळुंके, शिवाजी शिंदे, बालाजी फुंडकर, लक्ष्मण भागवत, राजू पठाडे, अशोक गायकवाड, सय्यद पठाण यांच्यासह ऊस उत्पादक हजर होते.जोरदार घोषणाबाजीबीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) कार्यालयाच्या तीन मजली इमारतीत दिवसभर धरणे आंदोलन केले. ‘ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेच पाहिजेत’, पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.मुलीचे लग्न जमले, पैसे नाहीत खात्यातनिपाणी टाकळी येथील हनुमाननगरातील रहिवासी गणपत चव्हाण यांनी आपल्या मुलीची लग्नपत्रिका आणली होती. ४ सप्टेंबर रोजी मुलीचे लग्न ठरविले आहे, असे सांगत चव्हाण म्हणाले की, साखर कारखान्यांनी एफआरपी दिला नाही. ८ महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहे. मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. बँकेतील खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagitationआंदोलन