शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी शेतकर्‍यांची पिळवणूक

By admin | Updated: May 12, 2014 00:38 IST

सोयगाव : शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी मूल्यांकन व कर्ज बाँडवर सही देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आर्थिक अपेक्षेतून शेतकर्‍यांची अगोदर अडवणूक व नंतर पिळवणूक केली जात आहे.

सोयगाव : शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी मूल्यांकन व कर्ज बाँडवर सही देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आर्थिक अपेक्षेतून शेतकर्‍यांची अगोदर अडवणूक व नंतर पिळवणूक केली जात आहे. शेतकर्‍यांनी सावकारी कर्ज न घेता राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घ्यावे यासाठी शासनाने पीक कर्जाची योजना सुरू केली आहे. शासनाच्या आदेशावरून बँका शेतकर्‍यांना पीक कर्ज देत आहेत. यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यात शेतकर्‍यांना आपल्या जमिनीचे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मूल्यांकन करून घ्यावे लागते, तसेच पीक कर्जाच्या बाँडवर दुय्यम निबंधक यांची सही व शिक्का घ्यावा लागतो. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाची कागदपत्रे गोळा करीत आहेत. सोयगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शेतकर्‍यांना मूल्यांकन व सही, शिक्का घेण्यासाठी दोन-दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. बाहेर गावहून येणार्‍या शेतकर्‍यांना दिवसभर बसवून ठेवले जात आहे. काहीतरी मिळेल या आर्थिक अपेक्षेतून शेतकर्‍यांची अशी अडवणूक केली जात आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकर्‍यांनी चिरीमिरी दिल्यानंतर त्याचे काम केले जात आहे. सोयगाव येथे शासकीय कामासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. एकतर बस मिळत नाही. खराब रस्त्यामुळे जाण्या-येण्यास उशीर होतो. त्यात अशाप्रकारे शेतकर्‍यांना त्रास दिला जात असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍याची अडवणूक व पिळवणूक थांबवून दुय्यम निबंधक कार्यालयात शेतकर्‍यांना पीक कर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. याविषयी दुय्यम निबंधक संजय घाडगे यांना विचारणा केली असता सही व शिक्का मारण्यासाठी शंभर रुपये घेतले जातात; परंतु पावती दिली जात नाही. वेळेअभावी संध्याकाळी एकत्र पावती तयार केली जाते. आॅपरेटर एकच आहे, शिपाई नाही, दस्तऐवज करण्यासाठी प्राधान्य दिले जाते, त्यामुळे शेतकर्‍यांना बसावे लागते, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)