शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांची थट्टा !

By admin | Updated: May 10, 2014 18:43 IST

उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे.

 उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासन स्तरावर अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे सिंचनाच्या या पद्धतींचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. असे असतानाच दुसरीकडे शासनाकडून शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम होताना दिसून येत आहे. २०११-१२ आणि २०१२-१३ या आर्थिक वर्षातील लाभार्थी शेतकर्‍यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर ठिबक, तुषार संच पुरविले जातात. या योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, यासाठी हे अनुदान दिले जात आहे. ही योजना शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून चांगली असली तरी वेळेवर अनुदान उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी शेतकरी चांगेलच अडचणीत सापडले आहेत. २०११-१२ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार ४३७ शेतकर्‍यांनी अनुदानासाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर संबंधित शेतकर्‍यांच्या प्रस्तावांना मंजुरीही मिळाली. विशेष म्हणजे यापैकी सर्वच्या सर्व शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात ठिबक, तुषार संचही बसविले. त्यानंतर अनुदानाची मागणी केली. मात्र तीन वर्ष लोटले तरी या शेतकर्‍यांना अनुदानाचा एक छदामही मिळालेला नाही. शेतकर्‍यांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अधीक्षक कृषी कार्यालयाकडूनही ‘वाट बघा’ असा सल्ला दिला जात आहे. उपरोक्त लाभार्थी शेतकर्‍यांच्या अनुदानापोटी ३ कोटी ३५ लाख ८२ हजार रुपये इतकी रक्कम गरजेची आहे. पाण्याचा प्रश्न लक्षात घेवून २०१२-१३ मध्ये या योजनेकडे शेतकर्‍यांचा अधिक कल वाढला. थोडे थोडके नव्हे तर चारपटीने लाभार्थी वाढले. लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ६ हजार २३ वर जावून ठेपला. या माध्यमातून सुमारे ५ हजार ४५८.२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. या शेतकर्‍यांना अनुदानापोटी १७ कोटी ९३ लाख १२ हजार इतकी रक्कम देणे अपेक्षित आहे. आज अखेर केवळ ७ कोटी २६ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार ते वितरितही केले. मात्र आणखी ५० टक्क्यावर शेतकरी अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत. ३ हजार ६०० शेतकर्‍यांसाठी १० कोटी ६६ लाख रुपये लागणार आहेत. ही रक्कम शासनाकडून अद्याप मिळालेली नाही. दोन वर्ष लोटली तरी अनुदान मिळत नसल्याने लाभार्र्थी शेतकर्‍यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी) पत्रावर पत्र सूक्ष्म सिंचन अनुदानाचे तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले असल्यामुळे शेतकर्‍यांचा या योजनेकडील कल कमी होऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अधीक्षक कृषी कार्यालयाकडून थकित १४ कोटी रुपयांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगितले. यासाठी वेळोवेळी स्मरण पत्र पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. उस्मानाबाद आघाडीवर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत २०१२-१३ या वर्षात उस्मानाबाद तालुक्यातील १ हजार ५८६ शेतकर्‍यांनी ठिबक आणि तुषार संच बसविले. त्याचप्रमाणे परंडा तालुक्यातील ९००, कळंब तालुक्यातील ९०३, तुळजापूर ७५९, उमरगा ५२९, भूम ५६९, लोहारा ४२१ आणि वाशी तालुक्यातील ३५४ शेतकर्‍यांनी सदरील संच बसविले आहेत. या माध्यमातून किमान ५ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आल्याचे कृषी विभागाने सांगितले.