शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भाव पाडल्याने शेतकºयांनी हिसकावले काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:29 IST

कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील आठवडी बाजारात मूग, उडदाचे भाव आठशे रुपयांपर्यंत पाडल्याने संतप्त शेतकºयांनी भुसार बाजार बंद पाडून व्यापाºयांचे वजन काटे हस्तगत करून दिवसभर बाजार बंद ठेवला.

लोकमत न्यूज नेटवर्कपोत्रा : कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील आठवडी बाजारात मूग, उडदाचे भाव आठशे रुपयांपर्यंत पाडल्याने संतप्त शेतकºयांनी भुसार बाजार बंद पाडून व्यापाºयांचे वजन काटे हस्तगत करून दिवसभर बाजार बंद ठेवला.बोल्डा येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. यात हिंगोली, आखाडा बाळापूर, कन्हेरगाव नाका, वसमत, शिरड अशा लांबवरून भुसार व्यापारी मालाची खरेदी करण्यास येतात. आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही उपबाजारपेठ आहे. ८ सप्टेंबर रोजी शेतकºयांनी मूग, उडीद विकायला आणले. तेव्हा मुगाला आठशे ते तीन हजार तर उडदाला आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव व्यापारी देत होते. यावरून शेतकरी संतापले. त्यांनी सिंदगी परिसरातील पोत्रा, येहळेगाव, गवळी, आसोला यासह अन्य गावातील शेतकरी जमा करून लूट करणाºया जवळपास व्यापाºयांचे काटे हस्तगत करून जमा केले. विशेष म्हणजे बाजार समितीने कोणत्याही व्यापाºयाला पावती बुक दिले नाही. त्यामुळे शेतकºयाला तशी पावती मिळत नाही. मटक्याच्या आकड्याच्या पावत्यासारख्या चिठ्ठ्या शेतकºयांना दिल्या जातात. या शिवाय बहुतांश व्यापाºयांकडे परवाना नाही. बाजार समितीचे कर्मचारी केवळ उखळ पांढरे करून घेण्यापुरती हजेरी लावतात. शेतकºयांचे नुकसान होत असल्याचे कोणालाही सोयरसूतक नाही. विशेष म्हणजे व्यापारी मालाला भावही कमी देतात. मालाच्या २०० ग्रॅमच्या पोत्यासाठी एक किलोची कटी कापतात, असे मत सिंदगीचे शेतकरी रमेश दत्तराव मगर यांनी व्यक्त केले. शिवाय ५०० ग्रॅम वजन जास्त झाले तरी व्यापारी त्याचे मोजमाप पकडत नाहीत. विशेष म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून शेतकºयांनी भुसार बाजार बंद ठेवला होता. फक्त भाजीपाला, कपडा, किराणा बाजार चालू होता. पं.स. सदस्य संजय मंदाडे, भाजयु मोर्चाचे विद्याधर मगर यांनी शेतकºयांची बाजू घेतली. यावेळी अमोल मंदाडे, कल्याण मगर, ओमकार सुर्यवंशी, नंदकुमार मंदाडे, पंकज मंदाडे, मुन्ना मगर, सुरेश सूर्यवंशी, चंद्रकांत मगर, नवनाथ सूर्यवंशी, माजिद सय्यद, संतोष मस्के आदींसह शेकडो युवा शेतकºयांनी व्यापाºयांचे वजन काटे हस्तगत करून दिवसभर भुसार बाजार बंद ठेवला. शेवटी कळमनुरी सहाय्यक निबंधक किरण चौधरी यांनी वेळीच धाव घेवून शेतकरी आणि व्यापाºयांची बैठक घेवून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सध्या मुगाला ५५७५ रुपये व उडदाला ५४०० रुपये हमी भाव आहे. हमी भावाप्रमाणे माल खरेदी करा, म्हणून चौधरी यांनी व्यापाºयांना फटकारले. ज्या शेतकºयांना कमी भाव मिळाला त्यांना त्या व्यापाºयाने उर्वरित रक्कम द्यावी, असा तोडगा काढून प्रकरणाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर कार्यवाही करा म्हणून मागणीवर जोर देत होते.