शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

संग्रहालयाचा विस्तार

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानात उभारलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा लवकरच विस्तार होणार आहे

औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानात उभारलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. सध्याच्या इमारतीवर दुसरा मजला बांधून त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या तैलचित्रांबरोबरच चलचित्रपटगृह, मीटिंग हॉल आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून ६ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी सिद्धार्थ उद्यानात दोन वर्षांपूर्वी मुक्तिसंग्राम संग्रहालय उभारण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारण्यात आले असून, त्यात मुक्ती लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे लावण्यात आलेली आहे. अजूनही असंख्य स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे लावणे बाकी आहे. त्यामुळे आता या मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या हे संग्रहालय तळमजल्यापुरतेच मर्यादित आहे. आता त्यावर एक मजला बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून या मजल्यासाठी ६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात महानगरपालिकेचा वाटा ५० टक्के म्हणजे तीन कोटी ३१ लाख रुपये इतका असणार आहे. महानगरपालिकेने नुकत्याच मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्राहालयाच्या विस्तारीकरणास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.