शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी

By बापू सोळुंके | Published: December 02, 2023 7:18 PM

दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर येथे आजपासून मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे. ग्रामीण भागातील प्रादेशिक संमेलनाची साहित्यप्रेमींना उत्सुकता लागली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचनसंस्कृती मागे पडत असल्याची चर्चा होत असते. असे असले तरी दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. वाचकांना दर्जेदार कथा, कादंबऱ्या आणि कविताही वाचायला आवडतात. तसेच माहितीपर पुस्तकांचीही चोखंदळ वाचकांकडून मागणी असते, असेही लेखक, प्रकाशकांनी नमूद केले.

ई कॉमर्स प्लॉटफार्मवरूनही पुस्तकांची विक्रीसोशल मीडियामुळे पुस्तके वाचली जात नाही, असा भ्रम आहे. उलट सोशल मीडियामुळे पुस्तके विकली जातात आणि वाचलीही जातात. पारंपरिक पुस्तकांसोबतच आता शेअर मार्केटची माहिती देणाऱ्यांसारख्या माहितीपूर पुस्तकांचा वाचक वाढला आहे. पूर्वी केवळ पुस्तक प्रकाशनातच पुस्तकांची विक्री होत होती. आता ॲमेझॉनसारख्या ई कॉमर्स प्लॉटफार्मवरूनही पुस्तकांची विक्री होते. साहित्य संमेलनात आम्ही पुस्तक विक्रीचे दोन स्टॉल घेतले आहे.- साकेत भांड, संचालक, साकेत प्रकाशन.

विक्री घटण्याचे कारण वाढलेल्या किमतीगंगापूर येथे होत असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात आम्ही तीन स्टॉल लावत आहोत. उद्या किती खरोखरच कमी झाली आहे. आजकाल पुस्तकांचे वाचन आणि विक्री फार खरोखरच कमी झाली आहे. ऑनलाइन विक्री होते, असे म्हटले जाते, पण ऑनलाइन विक्रीचे प्रमाण केवळ एक ते दीड टक्का आहे. पुस्तक विक्री घटण्याचे कारण पुस्तकाच्या वाढलेल्या किमती हे एक आहे. लेखक, कवींना स्वत:ची पुस्तके इतरांनी वाचावी, असे वाटते, पण ते इतरांची पुस्तके विकत घेऊन वाचत नाही, ही शोकांतिका आहे.-कुंडलिक अतकरे, अध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषद.

अनुवादित पुस्तकांनाही मागणी वाढली वाचकांना केंद्रबिंदू ठेवून प्रकाशकाने दर्जेदार लेखक शोधून आणि त्यांची पुस्तके छापली तर अशा पुस्तकांचे वाचकांकडून स्वागत होते. आजकाल मात्र हौशी लेखकांची पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा पुस्तकांना वाचकांकडून मागणी नसते. मात्र आजही जुन्या लेखकांच्या कथा, कादंबऱ्यांना वाचकांची मागणी आहे. शिवाय देश, विदेशातील बेस्ट सेलर पुस्तकांचा अनुवादित पुस्तकांनाही मागणी वाढली आहे. ऑनलाइनही विक्री चांगल्या प्रकारे होते. दर्जेदार पुस्तकांची निर्मिती होण्यासाठी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी एकत्र येऊन चळवळ निर्माण करणे गरजचे आहे.- विलास फुटाणे, संचालक, आदित्य प्रकाशन.

वाचक नावीन्यपूर्ण लेखनाच्या शोधातलेखक जी निर्मिती करतो, ती वास्तव जीवनातील संवेदनशीलतेने केलेली असेल तर वाचक त्यात गुंतून पडतो. विषय सामाजिक, राजकीय अथवा सांस्कृतिक असो, त्या विषयाची अभिव्यक्ती करताना, लेखक ज्या पद्धतीने करतो ती इतरांपेक्षा वेगळी असेल तर वाचक त्या लेखनात गुंतून पडतो. मग ती कथा असो, कादंबरी असो किंवा कविता असो. या सर्व लेखनाविषयी वाचकाच्या मनात प्रेम निर्माण होते आणि तो अशा नावीन्यपूर्ण लेखनाच्या आणि लेखकाच्या सतत शोधात असतो. मग अशी पुस्तके तो विकत घेऊनसुद्धा वाचत असतो.- डॉ. दादा गोरे, कार्यवाह, मराठवाडा साहित्य परिषद.

समाज, संस्कृती, साहित्य याची अभिरुचीदेखील संपन्नवाचनसंस्कृती नामशेष झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. साहित्य संमेलनात पुस्तके विकत घेतली जातात आणि ती वाचली जातात. जी प्रादेशिक संमेलने आहेत, त्या प्रादेशिक संमेलनात आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी पुस्तके विकत घेतली जातात, तीही वाचण्यासाठीच घेतली जातात. त्या लेखकाचा एक वाचकवर्ग तयार झालेला असतो. हा वाचक वर्ग केवळ कविता, कथा एवढ्यापुरता मर्यादित नाही. समीक्षा, संशोधन, वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाकडेही वाचक आकृष्ट झालेला असतो. म्हणून समाज, संस्कृती, साहित्य याची अभिरुचीदेखील संपन्नच होत आली आहे.- डॉ. ऋषिकेश कांबळे, साहित्यिक.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद