शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षानंतरही महिलेस धनादेश मिळेना

By admin | Updated: September 12, 2014 00:24 IST

जालना : घनसावंगी तालुक्यातील नांदी येथील एका महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी घडला

जालना : घनसावंगी तालुक्यातील नांदी येथील एका महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी घडला. मात्र अद्यापही सदर महिलेस जिल्हा परिषदेकडून मदतीचा धनादेश मिळेनासा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही जि.प. आरोग्य विभागाने अनास्था दाखविली आहे.नांदी येथील यमुनाबाई पांडुरंग माळी यांच्यावर ११ नोव्हेंबर २००९ रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली. मात्र ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर महिलेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर विमा कंपनीकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. शासनाच्या निर्णयानुसार अशा प्रकरणात ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देणे बंधनकारक आहे. परंतु जिल्हा परिषदेने याबाबत फारसे गांभीर्य न घेतल्याने पाच वर्षानंतरही सदर महिलेस मदत मिळालेली नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर महिलेस धनादेश देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे ९ सप्टेंबर रोजीच्या स्थायी समिती बैठकीत म्हटले होते.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एम. भटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यमुनाबाई माळी यांना कुटुंब कल्याण विमा योजनेअंतर्गत संबंधित विमा कंपनीकडून उशिराने प्राप्त झालेला ३० हजार रुपयांचा धनादेश मुदत संपण्यापूर्वी दहा दिवस अगोदर देण्यात आला. ४सदरील लाभार्थीने धनादेश बँकेत न वटविता मुदत संपल्यानंतर या कार्यालयास परत केल्यामुळे नूतनीकरणासाठी धनादेश विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. सदर धनादेश प्राप्त होण्यास विलंब होत असल्यामुळे माळी यांना विमा कंपनीकडून प्राप्त होणारा संभाव्य धनादेश जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जालना यांचेकडे जमा करण्याच्या लेखी हमी पत्र घेण्याच्या अटीवर धनादेश देण्यात येत आहे. हा धनादेश ११ सप्टेंबर रोजी दुपारी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.