ब्राह्मण समाजासाठी महामंडळ स्थापन करा

By Admin | Updated: July 31, 2014 00:42 IST2014-07-31T00:12:38+5:302014-07-31T00:42:13+5:30

बीड: ब्राह्मण समाजात अनेक युवकांच्या घरची अर्थिक स्थिती हालाखीची असल्याने व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

Establish corporation for Brahman Samaj | ब्राह्मण समाजासाठी महामंडळ स्थापन करा

ब्राह्मण समाजासाठी महामंडळ स्थापन करा

बीड: ब्राह्मण समाजात अनेक युवकांच्या घरची अर्थिक स्थिती हालाखीची असल्याने व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शासनाने पुढाकार घेऊन ब्राह्मण समाजातील युवकांची भाग भांडवलाची समस्या सोडविण्यासाठी अर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आले.
ब्राह्मण समाजातील अर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील तरूणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. यापूर्वी ब्राह्मण युवकांच्या आर्थिक विकासाठी अर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
याबरोबरच समाजाच्या कायदेशीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
ब्राह्मण समाजाला जाहीर सभांमधून जातीवाचक बोलले जाते. यामुळे ब्राह्मण समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
यासाठी ब्राह्मण समाजाचा समावेश अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये करावा, अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Establish corporation for Brahman Samaj