शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवाही होणार बंद

By admin | Updated: June 2, 2014 01:05 IST

नांदेड : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने आपल्या मागण्यांसाठी २६ मे पासून आंदोलन सुरु केले आहे़

नांदेड : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने आपल्या मागण्यांसाठी २६ मे पासून आंदोलन सुरु केले आहे़ शनिवारी जिल्हाकचेरीसमोर निदर्शने केल्यानंतर सोमवारपासून आता अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात येणार आहे़ त्यामुळे रुग्णांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत़ मॅग्मोने यापूर्वीच आंदोलनाच्या संदर्भात राज्य शासनाला कळविले होते़ परंतु शासनाकडून अद्यापही त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत भूमिका घेण्यात आली नाही़ त्यामुळे २६ मे पासून सुरु झालेले आंदोलन आता निर्णायक वळणावर येवून पोहचले आहे़ २६ मे पासून काळ्या फिती लावून काम करण्यात आले होते़ त्यानंतर शासकीय बैठका आणि शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला़ मॅग्मोने शासनाला मागण्या मंजूर करण्यासाठी ३१ मे ची डेडलाईन दिली होती़ त्यानुसार शनिवारी जिल्हाकचेरीसमोर वैद्यकीय अधिकार्‍यांनी धरणे आंदोलन केले़ आता मात्र सोमवारपासून अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात येणार आहेत़ त्यात बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभागातील सेवांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे़ परंतु एमएलसी आणि शवविच्छेदन विभागाची कामे मात्र करण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २ दोन वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राज्य संघटक डॉ़उत्तम इंगळे, डॉ़शेख बालन, डॉ़प्रताप चव्हाण, डॉ़निळकंठ भोसीकर, डॉ़राजेंद्र पवार यांनी दिली़ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या या आंदोलनामुळे सोमवारपासून मात्र रुग्णांचे प्रचंड हाल होणार असून त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही़ (प्रतिनिधी) एड्स नियंत्रण संघटनाही उद्यापासून संपावर वैद्यकिय अधिकार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य एड््स नियंत्रण संघटेनच्या नांदेड शाखेने पाठिंबा दिला आहे़ राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात जवळपास २५०० कर्मचारी कंत्राटी तत्वावर १० ते १२ वर्षापासून कार्यरत आहेत़ या कर्मचार्‍यांच्या मागण्याकडे शासनाने दुर्लक्षच केले आहे़ या कर्मचार्‍यांना कायम करण्याची मागणी संघटनेने केली आहे़ संघटनेचे अध्यक्ष प्रविण गुजर, विशाल कांबळे, अमोल पाडोळीकर, अंबिका कुलकर्णी, सुनिता वावळे, संतोष वाडीकर, इरफान सय्यद, माधव अल्लापूरे, अभिनंदन पांचाळ आदींनी केली़ या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्मचारी ३ जूनपासून संपावर जात आहेत़