शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन

By admin | Updated: July 15, 2016 01:10 IST

औरंगाबाद : अल्पवयीन पत्नीला जिवंत जाळून तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले

औरंगाबाद : अल्पवयीन पत्नीला जिवंत जाळून तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात घडली. दिलीप विठ्ठल राठोड (२३, रा. टाकरवण तांडा, ता. माजलगाव, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. ऊसतोडणीसाठी माजलगाव तालुक्यात दिलीपने १६ वर्षीय सोनाली जाधव (रा. अंतरवाला, ता. घनसावंगी, जि.जालना) या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले होते. मंदिरात लग्न केल्यानंतर ते दोघे एप्रिल महिन्यापासून वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे भाड्याने राहत होते. दरम्यान, किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर दिलीपने सोनालीला पेटवून दिले. नंतर तो पसार झाला होता. उपचार सुरू असताना ४ जुलै रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिलीप विरोधात खून क रणे, बाललैंगिक अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या कलमानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार झालेल्या दिलीपला पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन पकडून आणले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली. कारागृहात त्याने डोके दुखत असल्याची तक्रार केली. त्यास एमआरआय विभागाकडे पोलीस घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या हाताला झटका देऊन राठोडने गर्दीतून धूम ठोकली.