शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बी.ए., बी.एस्सी.च्या गुणपत्रिकेत चुका !

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बीए, बी.एस्सी. परीक्षेचा निकाल लागला असून, त्याचे गुणपत्रकही विद्यार्थ्यांच्या हाती पडले आहेत.

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बीए, बी.एस्सी. परीक्षेचा निकाल लागला असून, त्याचे गुणपत्रकही विद्यार्थ्यांच्या हाती पडले आहेत. त्या गुणपत्रकांमध्ये एटीकेटीमध्ये पात्र विद्यार्थ्यांनाही नापास करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांना इंटर्नलचे गुणच दिले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बी.ए., बी.एस्सी. प्रथम वर्षाचा निकाल नुकताच लागला आहे. त्याच्या गुणपत्रकाचे वाटप बुधवारी करण्यात आले. परंतु, विद्यापीठाने दिलेल्या गुणपत्रिकामध्ये एटीकेटीमध्ये पात्र अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांना इंटर्नलचे गुण देण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे. महाविद्यालयांनी इंटर्नल मार्क्सांची यादी पाठविली असताना त्याची नोंद गुणपत्रिकेत नाही. विद्यापीठाच्या या चुका विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार आहेत. त्या दुरुस्त केल्या जाव्यात, अशी मागणी रेणापूर युवा सेनेच्या वतीने विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या कुलगुरुंशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न युवा सेनेने केला होता. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यापीठ उपकेंद्रामार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर भीमाशंकर चापुले, अनिल भारसकर, अजिंक्य कदम, हरिभाऊ गायकवाड, विशाल कांबळे, अमित तळेकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(प्रतिनिधी)