Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:55 PM2021-09-30T15:55:54+5:302021-09-30T15:57:49+5:30

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यात पूरस्थिती आल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा दावा भाजपने फेटाळला आहे.

environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada | Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

googlenewsNext
ठळक मुद्देपुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूतजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेलीजबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यातच आता पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना (Jalyukt Shivar) कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. तसेच ही योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेल्यामुळे मराठवाड्यात ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोपही देऊळगावकर यांनी केला. मात्र, भाजपने देऊळगावकर यांनी केलेला दावा आणि आरोप फेटाळून लावला आहे. (environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada)

मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. त्याच वेळेला अनेक तज्ज्ञमंडळींनी तुम्ही नदीशी छेडछाड करू नका, असे सांगितले होते.  सर्व कामे बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तशी आखणी केली जाते. ते करताना तज्ज्ञांना किंवा अभ्यासकांना कोणीही विचारत नाही. त्याची ही परिणीती आहे, अशी टीका देऊळगावकर यांनी केली. 

जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

जलयुक्त शिवार योजना राबवताना काही ठिकाणी वाळू उपसली गेली. खरे पाहता नैसर्गिकरित्या पूर आटोक्यात आणणारे हे घटक आहेत. वाळू, आजूबाजूची झाडी, ती नष्ट झाल्यामुळे माती नदीच्या पात्रात जाऊन बसली. आता नदीच्या पात्रात किती माती आहे, हे मोजले पाहिजे. ती माती पाण्याला मुरू देत नाही. त्यामुळे प्रवाह वाढतो. मांजरा नदी तीन-तीन किलोमीटर कशी पसरते, पात्र ओलांडते, या सगळ्याची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी देऊळगावकर यांनी केली. 

दरम्यान, एखाद-दुसरे काम खराब झाले असेल, तर संपूर्ण योजनेला दोष देणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे म्हणणे योग्य नाही, उलट दुष्काळाच्या परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी सदर दावे, आरोप फेटाळून लावले. 
 

Web Title: environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.