शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू

By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST

वसमत: कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वसमत तहसीलसमोर मंगळवारपासून हे धर




वसमत: कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वसमत तहसीलसमोर मंगळवारपासून हे धरणे आंदोलन सुरू झाले आहे. बुधवारीही हे आंदोलन सुरूच होते.
वेतनश्रेणी व दर्जाबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, कृषी विभागाच्या योजना जि.प.कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करावा यासह १३ मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वसमत तहसीलसमोर मंगळवारपासून धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात एन. एम. देशमुख, एम. एस. इंगोले, शिवदास खाकरे, एस. जे. रावळे, शरद देशमुख, एन. व्ही. लोखंडे, आर. एस. संद्री, अनिरुद्ध पुंडगे, नवघरे, लोखंडे, सरनाईक, मुंडे, कुंभारकर आदींनी सहभाग नोंदविला.
कळमनुरी कृषी विभाग
कळमनुरी : विविध मागण्यांसाठी येथील तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर १२ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन केले.
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जा वाढीबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंलमबजावणी करावी, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करा, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण द्यावे, शून्य अधारित अर्थसंकल्पात कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी नियमित करा, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करा, आदी मागण्यांसाठी एक दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी डी. बी. काळे, पी. पी. पल्लेवाड, व्ही. डी. घुगे, एस. एन. सावंत, एस. एच. राठोड, डी. सी. जाधव, यू. बी. पवार, बी. जी. मस्के, शेळके, घोंगडे, स. रहीम, सातपुते, ए. व्ही. पडघन, आर. बी. भोजे, टी. एल. मते, बी. आर. इंगळे आदी उपस्थित होते.
औंढा कृषी विभाग
औंढा नागनाथ : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तहसीलदार श्याम मदनूरकर यांना मंगळवारी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात १६ जूलै २००४ च्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे, कृषी सहाय्यकांची पदोन्नती करणे आदी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीन टप्प्यात हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्ल्याचा इशारा निवेनात देण्यात आला आहे. निवेदनावर मंडळ कृषी अधिकारी एस. एस. शेळके, कृषी सहाय्यक जी. डी. राठोड, सी. एस. कल्याणकर, बी. जी. कीर्तने, आर. बी. हुलेकर, बी. आर. पवार, आर. एस. भिसे, जी. पी. लोसरवार, एल. ई. खंटींग, जी. यु. भोजे, एन. व्ही. म्हैसेकर, जी. जी. दरेगावकर, गच्चे, जी. एन. सोनुने, ए.एम. गोरे, डी.एल. माने, के.टी. खिल्लारे, वाय.एस. धाबे, एन.बी. चव्हाण, पी.आर. टेकाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)