शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल फेज योजनेचा बोजवारा

By admin | Updated: July 3, 2016 00:34 IST

राजेश खराडे , बीड ग्रामीण भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या सिंगल फेज योजनेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत

राजेश खराडे , बीडग्रामीण भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या सिंगल फेज योजनेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. सिंगलफेजच्या फिडरचा तुटवडा व दुरूस्ती कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे काळाच्या ओघात योजनेचा उद्देश बाजूला राहत आहे. थ्री फेज मधून सबंध गावाला विद्युत पुरवठा शक्य नसल्याने घरगुती ग्राहकांच्या दृष्टीने गाव तिथे सिंगल फेजचे फिडर उभारण्याचा उपक्रम महावितरणने राबविला होता. यामधून किमान १८ तास विद्युत पुरवठा होत असल्याने घरगुती ग्राहकांचा प्रश्न काही प्रमाणात का होईना मार्गी होता. मात्र, योजना बंद होताच उतरती कळा लागली आहे. १५ व २५ के.व्ही. ची रोहित्रे उपलब्ध होत नाहीत शिवाय दुरूस्तीकरिता एजन्सी नेमलेल्या नसल्याने बिघडलेल्या अवस्थेतच रोहित्र जागी पडून आहेत. मध्यंतरीच्या वादळी वाऱ्याने या रोहित्रांचे मोठे नुकसान झाले आहे.ग्रामस्थांना पदरमोड करून रोहित्रांच्या वाहतूकीपासून दुरूस्तीपर्यंतची कामे करावी लागत आहेत. विभागातील रोहित्रांच्या दुरूस्तीकामाच्या निविदा देण्यात आल्या नव्हत्या शिवाय दुरूस्ती साहित्याचा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांबरोबर विभागातील अधिकारी कर्मचारी हतबल झाले आहेत. नव्याने रोहित्रांचा पुरवठा बंद झाला असल्याने दुरूस्तीशिवाय पयार्य उरलेला नाही.२००५ साली सुरू झालेल्या सिंगलफेज योजनअंतर्गत ४ वर्षाच्या कालावधीत लोकसंख्येनुसार सिंगल फेजचे रोहित्र उभारण्यात आले होते.४योजना बंद झाल्यापासून नव्या राहित्रांचा पुरवठा बंद झाला आहे.४गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत केवळ रोहित्रांची दुरूस्ती करून वापर केला जात आहे. काळाच्या ओघात योजना केवळ नावालाच राहत आहे. १५ व २५ के.व्ही च्या रोहित्रांना चांगली आर्थिंग मिळत नाही शिवाय न्युट्रल वॉल तुटवडा असल्याने बिघाडाचे प्रमाण अधिक आहे. दुरूस्तीशिवाय महिना- महिना रोहित्र जागेवरून पडून असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहे. अनेक वेळा अधिकारी आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.