शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अठरा महिन्यांत बारा ग्रामसेवक

By admin | Updated: August 20, 2014 01:50 IST

कळंब : ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटातील अस्सल गावठी राजकारणाच्या कथानकाला साजेल, असं राजकीय ‘नाट्य’ सध्या कळंब तालुक्यातील अनेक गावांत घडत आहे.

कळंब : ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटातील अस्सल गावठी राजकारणाच्या कथानकाला साजेल, असं राजकीय ‘नाट्य’ सध्या कळंब तालुक्यातील अनेक गावांत घडत आहे. कधी नेतेगिरीच्या तोऱ्यात तर कधी जातीय स्वरुप देऊन, तर कधी एकमेकांविरुध्द खोट्यानाट्या तक्रारी देऊन राजकीय खुन्नस काढली जात आहे. राजकीय सारिपाटावरील या नव्या खेळीमुळे सर्वसामान्य मात्र बेजार झाल्याचे चित्र आहे. सत्तेच्या साठमारीत गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या खामसवाडीतही हाच प्रकार प्रकर्षाने दिसून येत आहे. दहा हजार लोकसंख्येचे खामसवाडी गाव लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठे शिवार, सुपीक जमीन, पारंपरिक सिंचनावर ऊस शेती, यामुळे गावाला आर्थिक सुबत्ता लाभली आहे. यास पुरक म्हणून येथे दुग्ध व्यवसायही जोपासला जात आहे. रोकडेश्वरी देवीचे जागृत देवस्थान असलेले खामसवाडी गाव तेरणा पट्यातील प्रमुख गाव असून राजकारणाचे ते केंद्रबिंदू मानले जाते. हेच राजकारण गावातील वातावरण बिघडविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मागील काही दिवसांतील घडामोडीवरुन दिसून येत आहे. मध्यंतरी राजकारणातील स्थित्यंतरे बदलली, संदर्भ बदलले. बदलानुरुप प्रस्थापितांना शह देण्यासाठी नव तरुणांचे नेतृत्व उदयास आले. आणि संघर्षाला सुरुवात झाली. परिणामी तडजोडीच्या आघाड्या आकारास येऊ लागल्या. सत्तेच्या साठमारीत माणूसपण हरवत जाऊन व्यक्तीद्वेष वाढत चालला. यात कोणताच नेता, पक्ष मागे नाही. मात्र बारमाही राजकारणामुळे गावातील वातावरण गढूळ होत आहे. (वार्ताहर)