तक्रार दिल्यावरून तिघांना आठ जणांची मारहाण

By Admin | Updated: November 18, 2015 00:41 IST2015-11-18T00:17:22+5:302015-11-18T00:41:06+5:30

अंबाजोगाई : आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार का केली? या कारणावरून तिघांना आठ जणांनी मिळून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी दुपारी चनई परिसरात घडला.

Eight people have been beaten up by the complaint | तक्रार दिल्यावरून तिघांना आठ जणांची मारहाण

तक्रार दिल्यावरून तिघांना आठ जणांची मारहाण

अंबाजोगाई : आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार का केली? या कारणावरून तिघांना आठ जणांनी मिळून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी दुपारी चनई परिसरात घडला.
चनई परिसरात राहणाऱ्या रेश्मा आदमाने, त्यांचे पती संजय आदमाने व दीर यांना गावातील गणेश क्षीरसागर, उत्तम क्षीरसागर, शाहू क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, अमोल मिसाळ, अविराज मिसाळ, युवराज गायकवाड, दीपक शिंदे या आठ जणांनी, तुम्ही आमच्या विरोधात पोलिसांत का तक्रार केली? यावरून घरातून बाहेर ओढत काठ्या, पाईपने बेदम मारहाण केली. रेश्मा संजय आदमाने यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. (वार्ताहर)

Web Title: Eight people have been beaten up by the complaint