शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अंडी उबवणूक केंद्राला घरघर

By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST

औरंगाबाद : पडेगाव येथील मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र नागरिकांच्या प्रतिसादाअभावी ओस पडले आहे.

 औरंगाबाद : पडेगाव येथील मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र नागरिकांच्या प्रतिसादाअभावी ओस पडले आहे. राज्यात शेतीबरोबर अनेक शेतकरी पशू व कुक्कुट पालनचा जोड व्यवसाय करतात. बहुतेक शेतकर्‍यांना या जोड व्यवसायाची गरज असते. शेतकर्‍याला लहान-मोठ्या प्रमाणात कुक्कुट पालन करताना मार्गदर्शन व मदत मिळावी यासाठी पडेगाव येथे उभारलेले मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र शहराबाहेर अडगळीत असल्यामुळे त्याला शेतकरी व व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत नाही. तीन कार्यालयीन इमारती व कुक्कुट पालनासाठी सात शेड बांधलेले, असे हे केंद्र आहे. या सगळ्याच इमारतीची देखभाल होत नसल्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे. सात शेडपैकी एकाच शेडमध्ये गिरीराज जातीच्या कोंबड्या आहेत. मात्र, त्यांचीही देखभाल व्यवस्थित केली जात नाही हे तेथील परिस्थिती दाखवते. केंद्राकडून शेतकर्‍यांना कुक्कुट पालन व्यवसायाचे १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, केंद्र दूर असल्यामुळे त्यासाठीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शेतकर्‍यांना अंडी उबवणूक केंद्रावर जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक, बाबा पेट्रोल पंपमार्गे पडेगाव, असा प्रवास करावा लागत असल्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्याकडे पाठ फिरवीत आहेत. मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्राचे डॉ. परसते यांच्याशी संपर्क साधला असता, ‘कोंबड्याच्या पिलांची विक्री चालू आहे. कार्यालयात या महिती देतो’, असे म्हणत त्यांनी मोबाईल बंद केला. केंद्रावरील अधिकार्‍यांचे कामाचे नियोजन नाही आणि प्रतिसादही मिळत नाही. त्यात केंद्र शहराबाहेर असल्यामुळे गरजूंना वेळेवर माहिती मिळत नाही. अधिकारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. -डॉ. एम.एस. स्वामी, कंत्राटदार, मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र पडेगाव येथे अंडी उबवणूक केंद्रावर कुक्कुट पालनाची माहिती घेण्यासाठी गेलो होतो; परंतु तेथील दुरवस्था पाहून निर्णय बदलला. प्रशिक्षण केंद्र किंवा मार्गदर्शन केंद्र व्यवसाय करण्यासाठी उत्साह निर्माण करणारे असावे. पडेगाव केंद्रावर गेल्यानंतर मरगळ येते. -दिनेश कुरुंद