शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात घट

By admin | Updated: September 21, 2014 00:25 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात गत तीन-चार वर्षातील दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ पाण्याअभावी २२५़५० हेक्टरचे क्षेत्र ८० हेक्टरावर आले

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात गत तीन-चार वर्षातील दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ पाण्याअभावी २२५़५० हेक्टरचे क्षेत्र ८० हेक्टरावर आले असून, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ तर गाळपासाठी लागणारा उपलब्ध ऊस आपल्याच कारखान्यात गाळप व्हावा, यासाठी कारखानदारांची मोठी धावपळ सुरू आहे़गत काही वर्षापूर्वी पारगाव व परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड करीत होते़ मांजरा नदीपात्रामुळे परिसरातील जलस्त्रोताची पाणीपातळीही चांगली राहत होती़ परिसरातील जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी उसाची लागवड केल्याने कारखानदारही या परिसरातील उसाची तोड करण्यासाठी धावपळ करीत होते़ या परिसरातील ऊस पारगाव येथील भिमाशंकर शुगर, वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखाना, सोनारी येथील भैरवनाथ शुगर्स, शहागड येथील समर्थ सहकारी साखर कारखाना, रांजणी येथील नॅचरल शुगर, हावरगाव येथील शंभू महादेव आदी कारखान्यात गाळपासाठी नेण्यात येत होता़ मात्र, या परिसरात असलेले २२५़५० हेक्टरवरील उसाचे क्षेत्र पावसाअभावी केवळ ८० टक्क्यांवर आले आहे़ पाण्याअभावी उसाचे उत्पन्न घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत़ तर उपलब्ध ऊस आपल्याच कारखान्यात काळपासाठी न्यावा, यासाठी कारखानदारांना पूर्वीपेक्षाही अधिक धावपळ करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे़ शिवाय उसाअभावी अनेक कारखान्याचे बॉयलर पेटेल की नाही हा प्रश्नही कायम आहे़ (वार्ताहर)