आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: September 4, 2015 00:19 IST2015-09-04T00:19:17+5:302015-09-04T00:19:17+5:30

वडवणी : आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा तालुक्यातील उपळी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. इरशाद अहमद पटेल (

The drowning of the young man drowning for bathing | आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू


वडवणी : आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा तालुक्यातील उपळी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली.
इरशाद अहमद पटेल (वय २२, रा. फकीरपुरा, परळी) असे त्या मयत तरूणाचे नाव आहे. इरशाद हा कामानिमित्ताने उपळी येथे आला होता. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तो तलावात आंघोळीसाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो दूरवर गेला व त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचे शव ग्रामस्थांनी बाहेर काढले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याला जिल्हा रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वडवणी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: The drowning of the young man drowning for bathing