बीड : कुठे सुन्या- सुन्या दावणी तर कुठे दावणीला पिळ देणारी गुरे़़़ तळाला गेलेल्या विहिरी- बोअऱ़़ धान्याचीही पंचाईत़़़़ वाढ खुंटलेल्या अन् कोमेजल्या पिकांचा उदास शिवाऱ़़ असे केविलवाणे चित्र जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात सगळीकडेच आहे़ दुष्काळी स्थितीमुळे जगणेच मुश्किल बनलेले शेतकरी आता उद्विग्न अवस्थेत मृत्यूला कवटाळू लागले आहेत़ समस्या एक नाही ़़़ झगडायचे तरी कुठवर अन् कसे? निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना यापेक्षा वेगळ्या नाहीत़ जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली़ सुगी वाया गेल्याने आता हतबल झालेल्या शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे तो केवळ जगण्याचा़ कधी एकदाच सालं सरेल अन् घामाचे मोती पिकतील़़़ याची शेतकऱ्यांना मोठी उत्कंठा लागली आहे़ दुष्काळाचे चक्रव्यूह भेदताना शेतकऱ्यांना एकना अनेक अडथळे पार पाडावे लागत आहेत़ मागच्या- पुढच्या पिकांचा ताळमेळच नसल्याने आर्थिक घडी पुरती विस्कटली आहे़ मीठ, मिरची अन् तेलाचीच चिंता दूर व्हायला तयार नाही़ ज्या शेतांमध्ये कष्टाने विक्री उत्पादन घेतले तेथे पेरलेले धान्यही परत मिळेल की नाही? अशी वाईट स्थिती आहे़ नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली;परंतु पावसाअभावी वाढ खुंटली अन् दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापासाचा झाडा होण्यास सुरुवात झाली़ तूर, सोयाबीनचेही असेच! बाजरीच्या कणसाला कुठे चार दाणे लागली तर कुठे काहीच नाही़ खरीप पिके घेऊन त्याच शेतात रबीची लागवड करु पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ही संधी भेटलीच नाही़ रुसून बसलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले़ पावसाच्या भरवशावर चाढ्यावर मूठ ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे़ नितीन कांबळे ल्ल कडाटिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून बागायतदारही ऊसतोड मजूर झाल्याचे विदारक चित्र आष्टी तालुक्यात दिसत आहे़कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये आष्टीचा आवर्जून उल्लेख केला जातो़ सलग पाच वर्षांपासून तालुका दुष्काळाला सामोरा जात आहे़ चारा, पाणी, धान्य आदी प्रश्न आ वासून उभे आहेत़ चारा नसल्यामुळे दुधाचा व्यवसाय बसला आहे़ अनेकांनी रोजगाराच्या शोधामध्ये कुटुंबियासह बाहेरगावी जाणे पसंत केले आहे़ त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली आहेत़ विहिरी, बोअर आटल्यामुळे पाण्यासाठीची भटकंती यंदाही कायम आहे़दरम्यान, दुष्काळी स्थितीचा व्यापारपेठेवर परिणाम दिसत असून उलाढाल कमी झाली आहे़ तालुका कायम दुष्काळी म्हणून जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना तात्पुरती मदत न करता ठोस उपाय करावेत, अशी मागणी जोर पकडू लागली आहे़
दुष्काळाने जगणे मुश्किल!
By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST
बीड : कुठे सुन्या- सुन्या दावणी तर कुठे दावणीला पिळ देणारी गुरे़़़ तळाला गेलेल्या विहिरी- बोअऱ़़ धान्याचीही पंचाईत़़़़
दुष्काळाने जगणे मुश्किल!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}