शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

कपातीच्या निर्णयामुळे धास्ती

By admin | Updated: December 11, 2014 00:24 IST

हिंगोली : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर विकासाचा वेगळा ट्रेेंड निर्माण होण्याची स्वप्ने पाहिली गेली. मात्र जुन्या सरकारवर खापर फोडून निधी कपातीची घोषणा करण्यात आली आहे.

हिंगोली : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर विकासाचा वेगळा ट्रेेंड निर्माण होण्याची स्वप्ने पाहिली गेली. मात्र जुन्या सरकारवर खापर फोडून निधी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. पुरवणी अर्थसंकल्पीय तरतुदीत मात्र काही प्रमाणात निधी मिळाल्याचे केवळ समाधान आहे.जिल्हा वार्षिक योजनेत जवळपास ८0 कोटी मंजूर आहेत. त्यापैकी ४८ कोेटी मिळाले आहेत. उर्वरित निधी हा चाळीस टक्केच राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून लावण्यात येणारी कात्री याच निधीला बसते की काय, अशी धास्ती निर्माण झाली आहे. काही योजनांत अधिकचे नियोजन करून पुढच्या वर्षीचा निधी त्याच कामासाठी वापरता येईल, अशा पद्धतीने नियोजन केले जाते. मात्र ही बाब यावर्षी अंगलट येण्याचीच चिन्हे आहेत. अशा पद्धतीने नियोजन केले अन् यंदाचाच पूर्ण निधी मिळाला नाही तर पुढील वर्षीच्या नियोजनाचे तीनतेरा वाजणार आहेत.विविध विभागांनी वार्षिक योजनेतील निधी खर्चासाठी आता हालचाली गतिमान केल्या आहेत. यापूर्वी सलग दोन निवडणुकांमुळे कोणत्याही विभागाला कामे करता आली नाहीत. एकतर आचारसंहितेने बरीच कामे खोळंबली होती. त्यानंतर इतर कामे अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात जुंपली गेल्याने रखडली होती. याचा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. अनेक कामे आता सुरू होत आहेत. विविध प्रकारच्या कामांच्या निविदापासून ते कामे सुरू होण्यापर्यंतचा काळ सध्या आहे. मात्र मध्येच निधी कपातीची महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा सर्वांनाच बुचकळ्यात टाकून गेली. यात नेमकी कोणती कपात होणार यावरून सं:दिग्धता दिसून येते. लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांतही याबाबतची चर्चा होत आहे.(वार्ताहर)