कंत्राटदारांनी लावलेली झाडे जगली नसतील तर बिले देऊ नका: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:26 IST2026-04-17T19:24:20+5:302026-04-17T19:26:19+5:30

कंत्राटदारांची खैर नाही! वृक्ष लागवडीत हलगर्जीपणा केल्यास बिलं विसरा; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.

Don't Pay Contractors if Planted Trees Don't Survive: PWD Minister Shivendraraje Bhonsle | कंत्राटदारांनी लावलेली झाडे जगली नसतील तर बिले देऊ नका: शिवेंद्रसिंहराजे भोसले

कंत्राटदारांनी लावलेली झाडे जगली नसतील तर बिले देऊ नका: शिवेंद्रसिंहराजे भोसले

छत्रपती संभाजीनगर : वृक्षलागवड करणे, हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा विशेष कार्यक्रम आहे. जर रस्ते व इतर सुविधांची कामे करताना कंत्राटदारांनी लावलेली झाडे जगली नसतील तर त्यांची देयके (बिले) अदा करू नका, असे आदेश बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी दिले. व्हीव्हीआयपी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये मंत्री भाेसले यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी बैठकीत विभागाची माहिती सादर केली.

केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड ५०५४ (०३), राज्यमार्ग ५०५४ (०४), जिल्हामार्ग व इतर मार्गांसह रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रमाचा भोसले यांनी आढावा घेतला. तसेच इमारतींच्या कामांची तरतूदनिहाय माहिती घेतली. हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत कामांवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर निविदेतील अटींप्रमाणे कारवाई करावी. कामाच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, असे आवाहनही भोसले यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.

या कामांविषयी व्यक्त केले समाधान
वेरूळ घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विटा व चुन्यामध्ये कमान पोकळी व घुमट रचना पद्धतीचे काम, विधी विद्यापीठातील मुलांची मेस, २०० खाटांचे महिला रुग्णालय, बीडमधील २०० खाटांचे रुग्णालय, एसआरटी अंबाजोगाई येथील बाह्यरुग्ण विभाग इमारतीच्या कामांवर मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचे मुख्यालय असून, येथे येणाऱ्या व्हीव्हीआयपींची संख्या अधिक आहे. त्यामुळे जुन्या विश्रामगृहाच्या दुरुस्तीची कामे लवकर हाती घेण्याच्या सूचना भोसले यांनी केल्या. अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत यांनी आभार मानले. कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता बैठकीस उपस्थित होते.

बजेटमध्ये १५०० कोटींची तरतूद ....
जिल्ह्यासाठी बजेटमध्ये १५०० कोटींची तरतूद असून, यातून ११०० कोटी रुपयांची बिले टप्प्याटप्प्याने अदा केली जातील, तर ४०० कोटी विकासकामांना उपलब्ध होतील, असे मंत्री भोसले यांनी बैठकीत सांगितल्याचे मुख्य अभियंता चव्हाण यांनी सांगितले. यापुढे नियमित निधी उपलब्ध होईल, असेही मंत्र्यांनी बैठकीत आश्वासित केल्याचे चव्हाण म्हणाले.

Web Title : पौधे जीवित रहने पर ही ठेकेदारों को भुगतान करें: शिवेंद्रसिंहराजे भोसले

Web Summary : मंत्री भोसले ने अधिकारियों को निर्देश दिया कि सड़क और बुनियादी ढांचा परियोजनाओं के दौरान लगाए गए पौधे जीवित नहीं रहने पर ठेकेदारों को भुगतान रोक दें। उन्होंने विभिन्न परियोजनाओं की समीक्षा की, गुणवत्ता और समय पर रखरखाव पर जोर दिया। उन्होंने निर्माण कार्यों पर संतोष व्यक्त किया।

Web Title : Pay contractors only if planted trees survive: Shivendrasinharaje Bhosle

Web Summary : Minister Bhosle instructed officials to withhold payments to contractors if planted trees don't survive during road and infrastructure projects. He reviewed various projects, emphasizing quality and timely maintenance. He also expressed satisfaction with ongoing construction and renovation works.