दांडीबहाद्दर डॉक्टरांची होणार पोलखोल !

By Admin | Updated: February 10, 2015 00:31 IST2015-02-09T23:50:28+5:302015-02-10T00:31:54+5:30

बीड : प्राथमिक आरोग्य केंद्रांचे तोंडही न पाहता महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणाऱ्या डॉक्टरांची आता गय नाही. कारण आरोग्य विभागाने बायोमेट्रिक यंत्र बसविणे अनिवार्य केले आहे.

Dokhbahadar doctor will take polkhol! | दांडीबहाद्दर डॉक्टरांची होणार पोलखोल !

दांडीबहाद्दर डॉक्टरांची होणार पोलखोल !


बीड : प्राथमिक आरोग्य केंद्रांचे तोंडही न पाहता महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणाऱ्या डॉक्टरांची आता गय नाही. कारण आरोग्य विभागाने बायोमेट्रिक यंत्र बसविणे अनिवार्य केले आहे.
जिल्ह्यामध्ये ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी ४१ ठिकाणी बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत त्यापैकी एकही सुरू नाही. नऊ नवीन यंत्रे तसेच ४१ जुन्या यंत्रांची दुरूस्ती केली जाणार आहे. येत्या १५ दिवसांमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व मुख्यालयी बायोमेट्रिक कार्यान्वित केले जाणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हजेरीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय राज्यस्तरावरूनच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पारदर्शकता येईल
बायोमेट्रिकमुळे उपस्थितीमध्ये पारदर्शकता येईल. डॉक्टरांनी २४ तास मुख्यालयी रहावे, अशा सूचना दिलेल्या आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Dokhbahadar doctor will take polkhol!