शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

मूत्ररोग विभागाला उधारीवरील डॉक्टराचे सलाईन

By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST

औरंगाबाद : नेफ्रो-युरॉलॉजी विभागासाठी डॉक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती तसेच यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली नसल्यामुळे आजही या विभागाला कुलूप लागलेले आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या नेफ्रो-युरॉलॉजी विभागासाठी डॉक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती तसेच यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली नसल्यामुळे आजही या विभागाला कुलूप लागलेले आहे. सर्जरी विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी मूत्ररुग्णांची संख्या सरासरी ३० टक्के असते. या रुग्णांचे ओझे मात्र केवळ तीन महिन्यांच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका मूत्ररोगतज्ज्ञाच्या खांद्यावर आहे.
घाटी रुग्णालयाच्या सर्जरी विभागांतर्गत सध्या मूत्ररोग विभाग आहे. मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील मूत्ररोगाने त्रस्त रुग्ण उपचारासाठी थेट घाटीत दाखल होतात. सर्जरी विभागाच्या ओपीडीमध्ये रोज सरासरी २५० रुग्ण दाखल होतात. त्यापैकी ३० टक्के रुग्ण जन्मत: लघवीचा मार्ग नसलेले चिमुकले, मूत्रखड्याचे रुग्ण, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झालेले, लघवीचा मार्ग अरुंद झालेले, पुरुष वंध्यत्वासंबंधी उपचार, किडनी कॅन्सर रुग्णांची संख्या अधिक आहे. अशा रुग्णांवर मूत्ररोगतज्ज्ञच दुर्बीणद्वारे अथवा शस्त्रक्रिया करण्यात येते.
खाजगी रुग्णालयातील उपचार गरीब रुग्णांना परवडत नाही, त्यामुळे ते थेट घाटीत येतात. रुग्णांची गरज ओळखून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी घाटी रुग्णालय अभ्यागत समितीचे अध्यक्ष असताना नेफ्रो-युरॉलॉजी विभागासाठी स्वतंत्र इमारतीसाठी निधी मंजूर करून आणला. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. घाटी प्रशासनाने नेफ्रो-युरॉलॉजी विभागासाठी स्वतंत्र पदनिर्मिती आणि इन्स्ट्रूमेंट खरेदीचा प्रस्ताव शासनास सादर केला. प्रस्ताव पाठवून तीन वर्षे झाले तरी या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नाही.
केवळ तीन महिन्यांसाठीच प्रतिनियुक्ती
रुग्णांची गरज लक्षात घेऊन घाटी प्रशासनाने मुंबईत कार्यरत असलेले मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. व्यंकट गिते यांना घाटीत तीन महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती दिली.
मात्र, येथे दाखल होणाऱ्या रु ग्णांची संख्या अधिक असल्याने घाटी प्रशासन वैद्यकीय शिक्षण संचालकांना दर तीन महिन्यांतून एकदा पत्र पाठवून डॉ. गिते यांना पुन्हा प्रतिनियुक्ती देण्याची विनंती करते. त्यानंतर कोठे या मूत्ररोगतज्ज्ञाला पुन्हा तीन महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती देण्यात येते. आता त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी केवळ चार दिवस शिल्लक असल्याचे सूत्राने सांगितले.