शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

खदानींच्या मोजणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By admin | Updated: December 16, 2015 00:14 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सरकारी आणि गायरान जमिनीवरील १०४ खदानींची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि खनिकर्म अधिकाऱ्यांना सोमवारी एका बैठकीत दिले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सरकारी आणि गायरान जमिनीवरील १०४ खदानींची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि खनिकर्म अधिकाऱ्यांना सोमवारी एका बैठकीत दिले. वाळू, मुरूम आणि दगडाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, ही पथके २४ तास गस्तीवर राहतील, असा दावा करण्यात आला आहे. खदानींची मोजणी करण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तालुका आणि जिल्हास्तरावर हे पथक कार्यरत राहणार असून वाळू, मुरूम आणि दगडाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाईल. या वाहनधारकांकडे पावती नसेल तर ते वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी दिली. जिल्ह्यातील खाजगी २४ क्रशर आणि खदानींच्या तपासणी अहवालात गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी आणि गायरान जमिनीवर असलेल्या १०४ खदानींची तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी एका बैठकीत घेतला. या खदानींची गौण खनिज विभागाचे अधिकारी टोटल मशीनद्वारे मोजणी करून तपासणी करतील. त्यांना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे मदत करणार असून, गायरान आणि सरकारी जमिनीवरील खदानींची मोजणी पूर्ण केल्यानंतरच त्यांचे परवाने दिले जातील. आठ महिन्यांत १८ कोटींची वसुली गौण खनिज विभागाने ८ महिन्यांत वाळूपट्ट्यांच्या लिलावातून आणि क्रशर, खदान मालकांकडून रॉयल्टीमधून १८ कोटी ४४ लाख २६ हजार रुपयांची वसुली केली आहे. मागील वर्षी ही वसुली ८ कोटी ४३ लाख इतकी होती. यावर्षी सरकारने ६० कोटींचे उद्दिष्ट दिले असून, अद्याप वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नाहीत. मार्चअखेरपर्यंत ४० कोटींची वसुली करणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी सांगितले.