शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासन लागले तयारीला

By admin | Updated: September 10, 2014 00:00 IST

परभणी : जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

परभणी : जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या उपस्थितीत कर्मचारी-अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पथकांची स्थापना करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ही निवडणूक यशस्वी पार पाडण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर असते. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणेनेही तयारी सुरू केली असून, त्यापार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण शिबीर पार पडले.फिरते पथक, स्थिर निगराणी पथक, व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक, व्हिडीओ पडताळणी पथक, खर्च संनियंत्रण पथक या संदर्भातील प्रशिक्षण नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय एक शासकीय अधिकारी व एक व्हिडीओग्राफर यांचे पथक कार्यान्वित केले जाणार आहे. या पथकाने व्हिडीओ संनियंत्रण पथकाकडून प्राप्त झालेल्या चित्रफिती तपासणे, त्यातील निवडणूक खर्चात घेण्यासाठी संबंधित पथकाने माहिती उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सहायक लेखाधिकारी व मदतनीस कर्मचारी यांचे पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने व्हिडीओ पुराव्याचे अंकेक्षण केले जाणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन किंवा आवश्यकतेनुसार त्यापेक्षा जास्त भरारी पथके स्थापन केली जाणार आहेत. त्यात एक वरिष्ठ कार्यकारी दंडाधिकारी हे पथकप्रमुख राहतील. एक वरिष्ठ पोलिस अधिकारी, तीन ते चार सशस्त्र पोलिस व एक व्हिडीओग्राफर असेल. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरुकता गटही स्थापन केले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या मतदाराचे नाव यादीत नाही, अशा मतदारांनी नमुना ६ अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रात भरावा. विधानसभेसाठी उमेदवारांना अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकांच्या १० दिवस अगोदरपर्यंत मतदारयादीत नावनोंदणी करता येईल.