शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींनी उतरविली बाटलीतील झिंग!

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

रसुल दा़ पठाण , एकुर्का रोड सेवानिवृत्ती नंतर लोक आराम आणि टाईमपास करण्याच्या गोष्टी शोधतात़ पण जिद्द व आंतरउर्मी असल्यास निवृत्तीनंतरही तरुण मनाने तडफदार कार्य करता येते अन् ते सिद्धीसही नेता येते

रसुल दा़ पठाण , एकुर्का रोडसेवानिवृत्ती नंतर लोक आराम आणि टाईमपास करण्याच्या गोष्टी शोधतात़ पण जिद्द व आंतरउर्मी असल्यास निवृत्तीनंतरही तरुण मनाने तडफदार कार्य करता येते अन् ते सिद्धीसही नेता येते, हेच दाखवून दिलेय् कल्लुरातील बिरादार गुरुजींनी़़़उदगीर तालुक्यातील दीड-दोनशे उंबऱ्यांचे कल्लूर हे छोटेसे गाव़ निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत वसलेल्या या गावातील सहशिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास करणारे सुरेश बिरादार यांनी सेवानिवृत्ती नंतर अभिनव व आव्हानात्मक उपक्रम हाती घेतले आहेत़ शिक्षकाला समाजाची नाडी समजते असे म्हणतात़ त्याप्रमाणे गावच्या युवा पिढीची नाडी ‘बाटली’च्या ओझ्याने ताणली जात असून ती रिचविल्यावर उठणारा हात संसारावर पाय देतो याची जाणीव गुरुजींना झाली़गाव सुधारणेच्या संधी शोधत असलेल्या बिरादार गुरुजींची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आणि मार्ग सुकर झाला़ तंटामुक्तीच्या आधारे गावातील तंटे सोडवितांना या तंट्यांचे मुळ दारु आहे हे त्यांच्या लक्षात आले़ एक युवक, मित्र मंडळी आणि पारावरची मंडळी यांचे हळूहळू प्रबोधन करीत दारुबंदीची मानसिकता रुजविण्यात गुरुजी यशस्वी झाले़दारु सोडल्यानंतर गाव सोडून गेलेल्या बाईलेकी पुन्हा नांदायला आल्या आणि गावाचे गोकुळ पुन्हा वसले हे जाणल्या नंतर मात्र संपूर्ण गाव या अभियानात गुरुजींच्या पाठीशी उभा राहिले़ नेहमी दारु पिऊन पोळयात बैलापेक्षा जास्त धिंगाणा करणाऱ्या आणि रंगपंचमीला रंगापेक्षा रक्तरंजित होळी खेळणाऱ्या दारुडे अशी अवहेलना झालेल्या गावाचे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे़ गणेश विर्सजन व इतर मिरवणुकीत आता बायका माणसे व बालके निर्धास्त सहभागी होवून आनंद साजरा करु लागली आहेत़केवळ दोन ते तीन महिन्यांमध्ये या गावाचा विलक्षण कायापालट झाला़ आता गुण्या गोविंदाने कष्टाळू वृत्ती आणि घासभर भाकर यासाठी जगणारे हे गाव अन् ग्रामस्थ पाहिले की मन:स्वी आनंद होतो, अशी प्रतिक्रिया बिरादार गुरुजींनी व्यक्त केली़