अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विविध ठरावांवर चर्चा

By Admin | Updated: May 29, 2015 01:04 IST2015-05-29T00:55:55+5:302015-05-29T01:04:43+5:30

औरंगाबाद : कालपासून सुरू झालेल्या अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध ठराव चर्चेला घेण्यात आले आहेत. त्यावर विस्तृत चर्चा करून ते संमत करण्यात येतील.

Discuss various resolutions in the ABVP national executive meeting | अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विविध ठरावांवर चर्चा

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विविध ठरावांवर चर्चा


औरंगाबाद : कालपासून सुरू झालेल्या अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध ठराव चर्चेला घेण्यात आले आहेत. त्यावर विस्तृत चर्चा करून ते संमत करण्यात येतील.
केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणात कोणत्या मुद्यांचा समावेश करण्यात यावा, यासाठी देशभरातील व्यापक विचारविनिमयानंतर अभाविपने एक मसुदा तयार केला आहे. प्रा. मिलिंद मराठे यांनी हा मसुदा बैठकीसमोर ठेवला. शैक्षणिक गुणवत्तेसाठी चांगली प्रशासनिक यंत्रणा असावी, संस्थांच्या श्रेणी व मानांकन प्रक्रियेत सुधारणा, नियमन व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना, केंद्रीय संस्था तसेच राज्याच्या अखत्यारीतील शिक्षण संस्थांना सक्षम बनविणे, उच्च शिक्षणातील कौशल्य विकासावर भर, बहिस्थ शिक्षण, सामाजिक व लिंगभेद मिटविण्यासाठी उपाययोजना, गुणवत्तापूर्ण शिक्षक निर्मितीवर भर, भारतीय भाषांमधून उच्च शिक्षण देण्यास प्रारंभ, ज्याद्वारे सांस्कृतिक एकात्मतेस बळ मिळेल, उच्च शिक्षणासाठी भरघोस निधी प्रदान करण्याची आवश्यकता, संशोधनावर मोठ्या प्रमाणात भर देण्याची गरज, या व अन्य मुद्यांवर या बैठकीत विषयवार चर्चा झाली.
संघटनात्मक कार्याचा आढावा
राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील अंबेकर यांनी मागील दहा वर्षांचे संघटनात्मक वृत्त बैठकीसमोर ठेवले. त्यानुसार अनेक प्रांतांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त सदस्यता करण्यात आली आहे.
अनेकांच्या भेटी
पाटीदार भवन येथे सुरू असलेल्या अभाविपच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस शहरातील अनेकांनी भेटी दिल्या. राज्याच्या महिला व बालकल्याण तसेच ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे- पालवे, नेहरू विकास केंद्राचे उपाध्यक्ष विष्णू शर्मा, भारतीय किसान संघाचे पश्चिम संघटनमंत्री श्रीरंग लाड, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, आ. अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, भाजपचे किशनचंद तनवाणी, बापू घडामोडे, अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक पाटील आदींनी कार्यकारिणी बैठकीस भेट देऊन उपस्थित प्रतिनिधींशी चर्चा केली.

Web Title: Discuss various resolutions in the ABVP national executive meeting