धनगर समाज रस्त्यावर

By Admin | Updated: July 31, 2014 00:44 IST2014-07-31T00:22:26+5:302014-07-31T00:44:56+5:30

उस्मानाबाद : राज्यातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी उस्मानाबादसह परंडा आणि भूम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Dhangar society on the streets | धनगर समाज रस्त्यावर

धनगर समाज रस्त्यावर

उस्मानाबाद : राज्यातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी उस्मानाबादसह परंडा आणि भूम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भूम येथे सकाळी ११ वाजता तालुका दुध संघापासून मोर्चास प्रारंभ झाला. यानंतर गोलाई चौकात रास्ता रोको करुन मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. भारतीय राज्य घटनेमध्ये धनगर समाजास सर्व देशात एस.टी. चे आरक्षण लागू असताना धनगर व धनगड असा भेद राज्य सरकार सवलतीपासून धनगर समाजास दूर ठेवत आहे. याचा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने सरकारच्या आरक्षणविषयक धोरणाचा तीव्र असंतोष आहे. दरम्यान, पंढरपूर ते बारामती आरक्षण रॅली काढून बारामती येथे मागील ९ दिवस १६ कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण करुनसुद्धा राज्य सरकारने याकडे दूर्लक्ष केले. राज्य शासनाच्या या कृतीचा निषेध निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचाव्यात, एस.टी. सवलतीची शिफारस राज्य सरकारने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या रास्ता रोकोमध्ये जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे, रा.स.प.चे तालुकाध्यक्ष पंडित मारकड, रघुनाथ वाघमोडे, रा.स.प.चे जिल्हा सरचिटणीस नाना मदने, सुभाष कांबळे, बाबासाहेब गोयकर यांच्यासह भूम तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने मेंढ्यासह समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
परंडा येथे रास्ता रोको
परंडा : येथील शिवाजी चौकात सकाळी ११ वाजता धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. बार्शी-करमाळा राज्यमार्ग आंदोलकांनी रोखून धरला, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनामध्ये अ‍ॅड. सुजीत देवकते, जयदेव गोफणे, परेश कोयले, राजाभाऊ देवकते, अशोक भिसे, दादा घुले, पिंटू सोलंकर, महादेव नरुटे, अरुण पाडोळे, दत्ता नरुटे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.
उस्मानाबादेत आंदोलन
उस्मानाबाद : तालुक्यातील वडगाव (सि) येथे सकाळी ११.३० वाजता मल्हार सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख धनाजी सातपुते, उपप्रमुख विकास घोडके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पैलवान, माजी जि.प. सदस्य नितीन पाटील, अण्णासाहेब जानराव, बाबा जानराव, प्रमोद पाटील, भारत घायाळ, श्रीराम घायाळ, गोविंद चादरे, शिवाजी घायाळ, भारत डोलारे, तानाजी सोनटक्के यांच्यासह आदी सहभागी झाले होते.

Web Title: Dhangar society on the streets