शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: August 15, 2014 00:03 IST

परभणी : धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी गंगाखेड, जिंतूर, राणीसावरगाव, झरी, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण आदी ठिकाणी चक्काबंद आंदोलन करण्यात आले.

परभणी : धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी गंगाखेड, जिंतूर, राणीसावरगाव, झरी, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण आदी ठिकाणी चक्काबंद आंदोलन करण्यात आले. तसेच चार ठिकाणी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण, पोखर्णी आदी ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले. परभणी शहरातील खानापूर फाटा येथे यवतमाळ-बीड या बसवर दगडफेक झाली. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी ही दगडफेक केली. त्यात बसच्या काचा फुटून नुकसान झाले. तसेच शहरातील वसमतरोडवर आसोला पाटीजवळ दुपारी अडीच्या सुमारास निजामाबाद-औरंगाबाद (एम.एच.२०-बी. एल. २२८८) या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये बसच्या काचा फुटल्या. या शिवाय आसोला पाटी शिवारातच दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास (एम. एच. १४ बी. टी. १३८२) सोलापूर - हिंगोली या बसवर दगडफेक झाली. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नाचन तपास करीत आहेत. गंगाखेड : गंगाखेड येथेही धनगर समाजबांधवांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे यांनी केले. रामचंद्र्र पोले, सुरेश बंडगर, लिंबाजी देवकते, प्रल्हाद शिंदे, नारायण घनवटे, उत्तमराव पोले, बालासाहेब नेमाने, गोविंद कचाले, अविनाश बरवे, भाऊसाहेब कुकडे, बालाजी टेकाळे, जितेश गोरे, ब्रिजेश शिंदे यांच्यासह आदींचा समावेश होता. जिंतूर : शहरातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ दुपारी १२ वाजता रास्ता रोको करण्यात आला. या संदर्भातील निवेदन तहसीलदार राम बोरगावकर यांना देण्यात आले. रास्ता रोकोमध्ये सुधाकर कुकडे, पुंजारे, आनंदराव कोरडे, रामराव हुलगुंडे, कुबेर हुलगुंडे, दीपक शेंद्रे, अर्जून वजीर, तुळशीराम कानडे, सटवाराव चिलगर, ज्ञानदेव नरुटे, मनोज शिंपले, डॉ. देवकते, सुगाजी गरगडे, अ‍ॅड. बनसोडे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)