विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबादेत हलविणार

By Admin | Updated: January 20, 2015 01:29 IST2015-01-20T01:23:39+5:302015-01-20T01:29:08+5:30

औरंगाबाद : पैठण येथील मराठवाडा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबाद शहरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

The departmental administrative training institute will move to Aurangabad | विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबादेत हलविणार

विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबादेत हलविणार


औरंगाबाद : पैठण येथील मराठवाडा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबाद शहरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या संस्थेसाठी कांचनवाडी येथे २५ एकर जागा देण्याची तयारी दर्शविली असून, त्याचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
पुणे येथील यशदा संस्थेच्या धर्तीवर ही प्रशिक्षण संस्था मराठवाड्यात काम करते.
औरंगाबाद उपविभागीय कार्यालयाने शहरालगतच्या गायरान जमिनींचा शोध घेतला. त्यातून कांचनवाडी येथील गट क्रमांक ९ मधील जमीन निश्चित केली. ही जमीन प्रशिक्षण संस्थेला देता येऊ शकते हे निश्चित झाल्यानंतर दोन दिवसांपासून या जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेण्यात आली. त्यानंतर आता ही जमीन देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सर्व प्रकारच्या खात्यात नव्याने दाखल होणाऱ्या वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण देण्यासाठी प्रबोधिनीत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांचा मोठा फौजफाटा आहे. प्रबोधिनीचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्या मदतीला २ उपजिल्हाधिकारी, तीन तहसीलदार आणि इतर विविध खात्यांतील तज्ज्ञ आहेत.

Web Title: The departmental administrative training institute will move to Aurangabad