शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली युनानी दवाखान्याचा कारभार शिपायावरच

By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST

अशोक तळेकर , पिंपरीघाटा आष्टी तालुक्यातील देवळाली येथील युनानी दवाखान्यामध्ये दोन वर्षापासून डॉक्टर नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही.

अशोक तळेकर , पिंपरीघाटाआष्टी तालुक्यातील देवळाली येथील युनानी दवाखान्यामध्ये दोन वर्षापासून डॉक्टर नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. शिवाय येथील कारभार सध्या शिपायावरच असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर नसल्याने केवळ 'दवाखान्याकडे पाहा अन् पानफूल वहा' अशी येथील अवस्था आहे.देवळाली पानाची हे चार हजार पेक्षा अधिक लोकवस्तीचे गाव आहे. येथे परिसरातील सात ते आठ वाड्यांचे ग्रामस्थ विविध कामांसाठी सातत्याने येत असतात. या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देवळाली येथे तब्बल ४० वर्षापूर्वी युनानी दवाखाना सुरु करण्यात आला. या दवाखान्यातून अनेक रुग्णांना उपचार मिळत होते. असे असले तरी दोन वर्षापूर्वी येथील डॉक्टरची बदली झाली आहे. यानंतर येथे डॉक्टर न दिल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. परिणामी रुग्णांना अधिक पैसे मोजून खाजगी उपचार घ्यावे लागत आहेत.या रुग्णालयात आजही परिसरातील काही रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र दवाखान्यात डॉक्टरच नसल्याने रुग्णांना आल्या पावली परतावे लागते. येथे डॉक्टर उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात असली तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. या दवाखान्यात सध्या शिपाई येतात. हेच शिपाई येथील कारभार हाकत असल्याचे अतुल जवणे यांनी सांगितले. या दवाखान्यातून रुग्णांना सेवा दिली जावी, अशी मागणी दत्तात्रय आमले, शिवाजी नवले, नवनाथ शेकडे आदींनी केली आहे.येथील युनानी दवाखान्यात डॉक्टर नसल्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चाबुकस्वार म्हणाले, जागा भरण्यासंदर्भात जि.प.ला कळविले आहे.