शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

शेख महेमूद तमीज, वाळूज महानगर बजाजनगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तिघांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेख महेमूद तमीज, वाळूज महानगरबजाजनगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तिघांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बजाजनगरसह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश व साथीच्या आजाराचे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अचानक ताप येऊन थंडी वाजणे, मळमळ व उलट्या होणे, हातपाय गळून पडणे, प्लेटलेटस्ची संख्या झपाट्याने कमी होणे आदी लक्षणे आढळत असल्यामुळे नागरिक भयभीत आहेत. बजाजनगरात एमआयडीसी प्रशासन खाजगी ठेकेदारामार्फत साफसफाईचे काम करीत असून ठेकेदार केवळ कागदोपत्री स्वच्छता करीत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.मध्यंतरी बजाजनगरात डेंग्यूसदृश व साथीच्या आजाराचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १०० घरांपैकी किमान १० घरांत पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना पाण्यात टाकण्यासाठी अ‍ॅबेटचे वाटप केले होते. डेंग्यू व साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एमआयडीसीने स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित केले होते. आता पुन्हा ‘जैसे थे’ अवस्था असून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे तसेच सांडपाणीही उघड्यावरून वाहत असल्यामुळे साथीचे आजार पुन्हा बळावत आहेत.विसर्जन विहिरीची सफार्ई कधी?वाळूज महानगर परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणपतीचे बजाजनगरातील एमआयडीसीच्या विहिरीत विसर्जन करण्यात आले होते. अद्यापपर्यंत परिसर व विहिरीची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या विहिरीत मोठ्या प्रमाणात निर्माल्य व मूर्ती टाकण्यात आल्यामुळे विहीर तुडुंब भरली आहे. अशातच या परिसरातील नागरिक केरकचराही या विहिरीत टाकतात. या परिसराची तसेच विहिरीची स्वच्छता करण्यासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप डॉ. मनोज जैन, गिरीश दुगड, आर.एन. दुगड, सुरेखा सुरवसे, सुरेखा पायगव्हाण, प्रभावती पेटकर, मनीषा खंदारे, शिल्पा काटकर, हिराबाई मोते, सुनील इंगळे, ललिता सुकासे, ताराबाई देवकर, योगिता भोकरे, प्रेरणा भुरावत, सारिका भुरावत, कोमल बनकर आदींनी केला आहे.