शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा कहर

By admin | Updated: July 12, 2014 01:06 IST

विकास राऊत, औरंगाबाद शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाळा लागला आहे.

विकास राऊत, औरंगाबादशहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाळा लागला आहे. कूलर, डबकी व साठवलेल्या स्वच्छ पाण्यातील डासांची पैदास वाढल्यामुळे तापाचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत. मनपा दप्तरी तीन महिन्यांत ७२ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असून, शंभरीकडे रुग्णांचा आकडा जात आहे. यासाठी मनपाचा घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई करणारा विभाग, दूषित पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जबाबदार आहे. आरोग्य विभागाकडे उपाययोजना करण्याची जबाबदारी असून अपुऱ्या साधनसामग्रीमुळे तो विभागही हताश झाल्याने डेंग्यूसारखे साथरोग शहरात बळावत आहेत. शिवाजीनगर, मुकुंदवाडी, गुरुदत्तनगर, अरिहंतनगर, विवेकानंदनगर, श्रीनिकेतन कॉलनी, नाथनगर, नक्षत्रवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-५ साईनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपूर, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा या भागांत नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मनपाने नालेसफाई तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. मनपा आरोग्य विभागाने नेहरूनगर, रहेमानिया कॉलनी, बेगमपुरा, शरीफ कॉलनी, जयभीमनगर, एन-११, मयूरनगर, नवनाथनगर, नवजीवन कॉलनी, बारी कॉलनी, विष्णूनगर, शिवशंकर कॉलनी, भानुदासनगर, बौद्धनगर, एकतानगर, वानखेडेनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, बनेवाडी या भागांमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे पाहणी केली आहे. का होतो डेंग्यू...शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे नागरिक चार ते पाच दिवस पाणी साठवून ठेवत आहेत. त्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तो डास चावल्यामुळे साथरोगांचा प्रसार होतो आहे. शिवाय नालेसफाई, कचरासंकलन, दूषित पाण्यामुळेही साथरोगांचे प्रमाण वाढले आहे.डासांमुळे होणारे आजारडासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुन गुनिया हे आजार होतात. अ‍ॅनाप्लेक्स डासामुळे हिवताप येतो. इजिप्टाय हा डास चावल्यास डेंग्यू व चिकुन गुनिया होतो. फ्युलेक्स हा डास चावल्यास हत्तीरोग होतो. आजाराची लक्षणेतीव्र ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, सांधे व अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, क्वचित पुरळ येणे ही डेंग्यूची, तर थंडी वाजून येणे, सतत किंवा दिवसाआड ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत....तर होतो डेंग्यूएडिस इजिप्टाय हा डास चावल्यास डेंग्यू आजार होतो. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. या डासांच्या पायांना पांढरा चकाकणारा रंग असतो. फक्त डेंग्यू व्हायरसने पीडित असलेला डास मानवाला चावल्यास डेंग्यूचा आजार होतो. कशी घेणार काळजीआठवड्यातून एकदा भांडी स्वच्छ धुऊन, कोरडी करून पाणी गाळून भरावे. स्वच्छ पाणी झाकून ठेवावे. डासविरोधी साधनांचा वापर करावा. घर स्वच्छ ठेवावे. परिसरात वाढलेले गवत, झुडपे कापून टाकावीत.४३ हजार घरांच्या पाहणीचा दावा१२६ अतिसंवेदनशील परिसरांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे. त्यातील ४३ हजार ४३२ घरांची पाहणी केली आहे. १ लाख २८ हजार ३७० कंटेनर तपासले असता २१३ कंटेनरमध्ये डास अळ्या आढळून आल्या. १०१ रुग्णांचे नमुने प्रशासनाने घेतले आहेत.